केंद्रीय मंत्री निशीथ प्रामाणिक यांच्या घराबाहेर बॉम्ब सापडला आहे. पोलिसांनी हा बॉम्ब निकामी केला. याशिवाय बंगालमध्ये दगडफेक झाली. या हिंसाचारात भाजप नेता जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. सध्या परिसरात तणावाचं वातावरण आहे. या भागात पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.
पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींचा तृणमूल विरुद्ध भाजप संघर्ष गेल्या दहा वर्षात मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाला. स्थानिक निवडणुका असोत किंवा लोकसभेच्या तृणमूल विरुद्ध भाजप असा संघर्ष आणि तणाव दोन्ही असतो. काही दिवसांपूर्वी ममता बॅनर्जी यांच्या ताफ्यावर हल्ला झाल्याच्या अफवा उठल्या होत्या.
advertisement
मतदानादरम्यान काही भागांमध्ये हिंसाचार सुरू आहे. पश्चिम बंगालमध्ये सकाळपासून 15 टक्के मतदान झालं आहे. उन्हामुळे नागरिक सकाळी मतदान केंद्रावर मतदानासाठी पोहोचले होते. तर सर्वांनी मतदान करावं असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे.