राजस्थानच्या जैसलमेर जिल्हा मुख्यालयातील हॉटेलमध्ये शनिवारी एका बीएसएफ जवानाचा संशयास्पद मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. शवविच्छेदन अहवालात जवानाला दारू पिऊन उलट्या झाल्याचं समोर आलं. मात्र त्यानं तोंड रुमालानं झाकले होतं त्यामुळे उलटी पुन्हा विंडपाइपमध्ये अडकली आणि जावानाचा मृत्यू झाला. पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये ही बाब समोर आली आहे. हा सैनिक यूपीचा रहिवासी होता.
advertisement
रेल्वे ट्रॅक ओलांडताना रुळांमध्ये अडकली कार, समोरून आली ट्रेन; काही सेकंदात कारचे झाले तुकडे
जवान आदर्श कुमार राय (43) हे उत्तर प्रदेशातील गोरखपूर जिल्ह्यातील कांकरोली येथील रहिवासी होते. आदर्श कुमार हे जैसलमेर येथील दाबला बीएसएफमध्ये ड्युटीवर तैनात होते. शनिवारी रात्री घरी जाण्यासाठी सुटी घेऊन निघाले होते. मात्र ट्रेन रात्री उशिरा असल्यानं त्यांनी रेल्वे स्थानकासमोरील हॉटेलमध्ये मुक्काम केला. आदर्शने हॉटेलच्या खोलीत दारू प्यायली.
शवविच्छेदन करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितलं की, त्यादरम्यान शिपायाला उलट्या झाल्या. यावर त्यानं रुमालानं तोंड बंद केलं. त्यामुळे उलटी पुन्हा जवानाच्या विंडपाइपमध्ये गेली. त्यामुळे श्वसनमार्गात अडथळा निर्माण झाल्याने त्यांचा मृत्यू झाला असावा. ट्रेनची वेळ होऊनही जवान खोलीतून बाहेर न आल्यानं हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी त्याला बाहेरून वारंवार बोलावलं. पण आतून काहीच प्रतिसाद आला नाही. यावर हॉटेल कर्मचाऱ्यांनी जैसलमेर पोलिस ठाण्यात माहिती दिली. पोलीस घटनास्थळी पोहोचल्यावर त्यांनी रुमचा दरवाजा उघडला आणि आतमध्ये जवान मृत दिसला.
