रेल्वे ट्रॅक ओलांडताना रुळांमध्ये अडकली कार, समोरून आली ट्रेन; काही सेकंदात कारचे झाले तुकडे
- Published by:Suraj Yadav
Last Updated:
चालकाने रेल्वे क्रॉसिंग ओलांडण्याचा प्रयत्न केला. पण ट्रॅकवर दगड आणि मातीत चाके अडकली.
मुंबई, 19 डिसेंबर : रेल्वे ट्रॅक क्रॉस करत असताना एक कार अचानक अडकली. त्यानंतर समोरून येणाऱ्या ट्रेनने जोराची धडक दिल्याने कारचा चक्काचूर झाला. सुदैवाने चालकाने प्रसंगावधान राखत बाहेर उडी मारली आणि ट्रॅकवरून बाजूला झाला. कारला काही अंतर ट्रेनने फरफटत नेले. ही घटना मध्य प्रदेशातील इंदौमध्ये झाली. बाणगंगा परिसरातील सुपर कॉरिडॉरजवळ रेल्वे क्रॉसिंगवर अपघात घडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कार दिल्लीहून इंदौरला निघाली होती. चालकाने रेल्वे क्रॉसिंग ओलांडण्याचा प्रयत्न केला. पण ट्रॅकवर दगड आणि मातीत चाके अडकली. तेव्हा समोरून जयपूर-दिल्ली सुपरफास्ट एक्सप्रेस येत होती. अडकलेल्या कारला ट्रेनने जोराची धडक दिली. यात कारचा चक्काचूर झाला.
घटनेची माहिती मिळताच अधिकाऱ्यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. रेल्वे अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी केली. धडकेनंतर कारचे काही भाग ट्रेनच्या इंजिनमध्ये अडकले. यामुळे ट्रेनही काही काळ थांबवावी लागली होती.
advertisement
ट्रॅकवरून कार हटवण्यात आली आहे. त्यानंतर ट्रेनचं इंजिन आणि रूळ दोन्हींची तपासणी करण्यात आली. सर्वकाही व्यवस्थित असल्याची खात्री केल्यानंतरच ट्रेन पुढे सोडण्यात आली. सुदैवाने या दुर्घनटेत कोणतीही जिवित हानी झाली नाही.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Dec 19, 2023 12:47 PM IST
मराठी बातम्या/देश/
रेल्वे ट्रॅक ओलांडताना रुळांमध्ये अडकली कार, समोरून आली ट्रेन; काही सेकंदात कारचे झाले तुकडे







