TRENDING:

बसचा भीषण अपघात, डंपरला धडकताच घेतला पेट; 13 जणांचा होरपळून मृत्यू, 25 जखमी

Last Updated:

धडकेनंतर बस उलटली आणि आग लागून १३ जणांचा होरपळून मृत्यू झाला. तर २५ जण बसची काच तोडून बाहेर आल्याने वाचले.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
भोपाळ, 28 डिसेंबर : बस आणि डंपरची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. धडकेनंतर बस उलटली आणि आग लागून १३ जणांचा होरपळून मृत्यू झाला. तर २५ जण बसची काच तोडून बाहेर आल्याने वाचले. मध्य प्रदेशातील गुना इथं ही दुर्घटना घडली. या दुर्घटनेनंतर मुख्यमंत्री डॉक्टर मोहन यादव यांनी दु:ख व्यक्त केलं. बस दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी ४ लाख रुपयांच्या आर्थिक मदतीची घोषणा केलीय तर जखमींना प्रत्येकी ५० हजार रुपये दिले जातील. या अपघाताची चौकशी केली जाईल आणि असे अपघात पुन्हा होणार नाहीत याची खबरदारी घेण्याचे आदेश परिवहन विभागाला देण्यात आले आहेत.
News18
News18
advertisement

याबाबत मिळालेली माहिती अशी की, बस २७ डिसेंबर रोजी रात्री साडे आठच्या सुमारास आरोनला जाण्यासाठी निघाली. अर्ध्या तासाने ९ च्या सुमारास बजरंगगढ ठाण्याच्या अलिकडे ५ किमी अंतरावर वेगवान डंपरला बस धडकली. ही धडक इतकी भीषण होती की बस उलटली. त्यानंतर आग भडकली. आग लागल्यानंतर मोठा गोंधळ उडाला. लोकांना काही समजण्याच्या आतच आगीने रौद्र रुप धारण केलं. या आगीत १३ जणांचा होरपळून मृत्यू झाला.

advertisement

सिकरवार ट्रॅव्हल्सची बस २०२२ च्या १७ फेब्रुवारीपासून अनफिट होती. तरीही ती चालवली जात होती. धक्कादायक बाब म्हणजे या बसचा विमा नव्हता. या प्रकरणी आरटीओचा बेजबाबदारपणाही समोर आला आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून पाच मृतदेह बाहेर काढले आहेत. मृतदेह जळालेल्या अवस्थेत असल्याने ओळख पटवण्याचं काम सुरू आहे.

मराठी बातम्या/देश/
बसचा भीषण अपघात, डंपरला धडकताच घेतला पेट; 13 जणांचा होरपळून मृत्यू, 25 जखमी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल