अंशुमन यांच्या पत्नीने त्यांची लव्हस्टोरीही सांगितलीय. लव्ह एट फर्स्ट साइट प्रेम होत. दोघेही एकमेकांना पहिल्याच नजरेत आवडले होते असं स्मृती यांनी सांगितलंय. स्मृती सिंह यांनी पती कॅप्टन अंशुमन सिंह यांच्याबाबत बोलताना संगितलं की, ते मला म्हणायचे की मी माझ्या छातीवर पीतळ घेऊन मरेन. मी सामान्य मृत्यूने मरणार नाही. ते खूप पात्र होते.
advertisement
स्मृती यांनी दोघांची लव्ह स्टोरी सांगताना म्हटलं की,"आम्ही दोघांनी एकाच कॉलेजमधून इंजिनिअरिंग केलं. आम्ही कॉलेजच्या पहिल्याच दिवशी एकमेकांना भेटलो होतो. हे काही नाट्यमय नाहीय, पण पहिल्याच नजरेत प्रेम झालं. एक महिन्यानंतर अंशुमन यांची निवड आर्म्ड फोर्सेस मेडिकल कॉलेजमध्ये झाली. ते खूप इंटेलिजंट होते आणि आम्ही ८ वर्षे लाँग डिस्टन्स रिलेशनशिपमध्ये होतो. त्यानंतर लग्नाचा विचार केला आणि लग्न केलं." अंशुमन आणि स्मृती यांचं लग्न फेब्रुवारी २०२३ मध्ये झालं होतं. तर १९ जुलै २०२३ ला सियाचिनमध्ये अंशुमन हे वयाच्या २६ व्या वर्षी शहीद झाले.
शहीद कॅप्टन अंशुमन सिंह यांच्या पत्नी स्मृती यांनी सांगितलं की, दुर्दैव, लग्नाच्या दोन महिन्यांनी त्यांचं पोस्टिंग सियाचिनमध्ये झालं. १८ जुलैला आम्ही पुढच्या ५० वर्षात आपलं आयुष्य कसं असेल यावर बोललो. घर, मुलं यावर चर्चा केली. १९ तारखेला सकाळी फोन आला की ते राहिले नाहीत. पहिल्या ७-८ तासात तर आम्हाला हे स्वीकारताच आलं नाही की असंही काही होऊ शकतं. आजपर्यंत मी त्यातून सावरण्याचा प्रयत्न करतेय. विचार करतेय की कदाचित हे सत्य नसावं.
आज माझ्या हातात कीर्ति चक्र घेतलं तेव्हा मला हे सत्य आहे याची जाणीव झाली. पण ते एक हिरो आहेत. आम्ही आमचं आयुष्य सावरू शकतो कारण त्यांनी खूप काही सावरलं आहे. त्यांनी आपलं जीवन आणि कुटुंबाचा त्याग केला. तीन कुटुंबांना वाचवण्यासाठी आपलं जीवन पणाला लावलं असं स्मृती सिंह म्हणाल्या.
