युपीए सरकराच्या काळात ही भरती सुरू करण्यात आली होती असा उल्लेख केला. या पत्रात असं म्हटलं की, 2005 मध्ये वीरप्पा मोईली यांच्या अध्यक्षतेखाली पहिल्यांदा लॅटरल एन्ट्रीसाठी शिफारस करण्यात आली होती. आता सतत यावर प्रश्न उपस्थित केले गेल्यानं थेट भरतीची जाहिरात रद्द केली असल्याची माहिती केंद्रीय मंत्र्यांनी दिली.
युपीएससीमार्फत होणाऱ्या लॅटरल एन्ट्रीवर विरोधी पक्षांनी सरकारवर प्रश्न उपस्थित केले होते. लोकसभेत विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासह विरोधी पक्षांच्या नेत्यांनी युपीएससी लॅटरल एन्ट्री आणि त्यात आरक्षण न दिल्यानं विरोध केला होता. यानंतर सरकारमधील इतर घटक पक्षांनीही आवाज उठवला. यानंतर आता सरकारने युपीएससीतील लॅटर एन्ट्रीची जाहिरात रद्द करण्याचे आदेश दिले आहेत.
advertisement
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 20, 2024 2:05 PM IST
मराठी बातम्या/देश/
UPSC : लॅटरल एन्ट्रीला स्थगिती, पंतप्रधान मोदींच्या सूचनेनंतर केंद्रीय मंत्र्यांचं युपीएससीला पत्र