TRENDING:

Chandrayan 3 : चांद्रयान 3ची कमाल, डेटा पाहताच जगभरातील वैज्ञानिकांना आश्चर्याचा धक्का; वाचा सविस्तर

Last Updated:

चांद्रयान-3मधला विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हरने 14 दिवस चंद्रावरची वेगवेगळ्या प्रकारची महत्त्वपूर्ण माहिती गोळा केली.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
दिल्ली, 14 ऑक्टोबर : 'चांद्रयान-3' ही भारताची महत्त्वाकांक्षी चांद्रमोहीम यशस्वी ठरली आहे. 23 ऑगस्ट 2023 रोजी सायंकाळी हे यान चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरलं. चांद्रयानमधल्या विक्रम लँडरच्या सॉफ्ट लँडिंगमुळे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा भारत हा पहिलाच देश ठरला आहे. चांद्रयान-3मधला विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हरने 14 दिवस चंद्रावरची वेगवेगळ्या प्रकारची महत्त्वपूर्ण माहिती गोळा केली. त्या माहितीमुळे जगभरातले शास्त्रज्ञ आश्चर्यचकित झाले आहेत. अमेरिकन रिसर्च प्रोफेसर जेफ्री गिलिस डेव्हिस यांनी एका लेखात चांद्रयान-3च्या सर्व यशांबद्दल तपशीलवार माहिती दिली आहे. 'लाइव्ह हिंदुस्तान'ने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
चांद्रयान 3
चांद्रयान 3
advertisement

स्पेस डॉट कॉमवर लिहिलेल्या लेखात जेफ्री गिलिस डेव्हिस यांनी असं म्हटलं आहे, की चांद्रयान-3ने जमा केलेल्या डेटावरून असं निदर्शनास आलं आहे, की चंद्राच्या मातीमध्ये लोह, टिटॅनियम, अॅल्युमिनियम आणि कॅल्शियमसारखे अपेक्षित घटक आहेत; मात्र सल्फरचा शोध आश्चर्यकारक आहे. डेव्हिस लिहितात, "माझ्यासारख्या खगोलशास्त्रज्ञाला हे माहीत आहे, की चंद्रावरच्या खडकांमध्ये आणि मातीमध्ये सल्फर आहे; पण ते अगदी कमी प्रमाणात आहे. हा नवीन डेटा सूचित करतो, की सल्फरचं प्रमाण अंदाजापेक्षा जास्त असू शकतं." प्रज्ञानकडे मातीचं विश्लेषण करणारी दोन उपकरणं आहेत. अल्फा कण एक्स-रे स्पेक्ट्रोमीटर आणि लेसर-प्रेरित ब्रेकडाउन स्पेक्ट्रोमीटर (एलआयबीएस) अशी ही दोन उपकरणं आहेत. या दोन्ही उपकरणांनी लँडिंग साइटजवळच्या मातीमधलं सल्फरचं प्रमाण मोजलं आहे.

advertisement

यावरून असं दिसतं, की हे मोजमाप विज्ञानाला सक्षम करणाऱ्या संशोधनाचं उदाहरण आहे, असा शास्त्रज्ञांचा दावा आहे. गडद ज्वालामुखीय खडक आणि उंचावरचे तेजस्वी खडक अशा दोन प्रकारचे मुख्य खडक चंद्राच्या पृष्ठभागावर आहेत. पृथ्वीवरच्या प्रयोगशाळांमध्ये चंद्रावरच्या खडकाची आणि मातीची रचना तपासणाऱ्या शास्त्रज्ञांना असं निदर्शनास आलं आहे, की गडद ज्वालामुखीच्या मैदानातल्या सामग्रीमध्ये उंचावरच्या तेजस्वी खडकाळ प्रदेशातल्या सामग्रीपेक्षा जास्त सल्फर आहे.

advertisement

सल्फर मुख्यत्वे ज्वालामुखीय क्रियाकलापातून निर्माण होतं. चंद्राच्या खोलगट भागात असलेल्या खडकांमध्ये सल्फर आहे आणि जेव्हा हे खडक वितळतात तेव्हा सल्फर मॅग्माचा भाग बनतं. जेव्हा वितळलेला खडक पृष्ठभागाच्या जवळ येतो तेव्हा मॅग्मामधलं बहुतेकसं सल्फर पाण्याची वाफ आणि कार्बन डाय ऑक्साइडसह वायूमध्ये रूपांतरित होतं.

सल्फरचा शोध लागण्याची पहिलीच घटना

काही सल्फर मॅग्मामध्ये राहतं आणि मॅग्मा थंड झाल्यावर खडकातच राहतं. ही प्रक्रिया असं स्पष्ट करते, की सल्फर मुख्यतः चंद्राच्या काळ्या ज्वालामुखीच्या खडकांशीच का संबंधित आहे. चांद्रयान-3द्वारे चंद्राच्या मातीत सल्फरचा शोध लागण्याची ही पहिलीच घटना आहे. डेटा कॅलिब्रेशन पूर्ण होईपर्यंत सल्फरचं अचूक प्रमाण निर्धारित केलं जाऊ शकत नाही. प्रज्ञानवरच्या एलआयबीएस उपकरणानं गोळा केलेला अनकॅलिब्रेटेड डेटा सूचित करतो, की चंद्राच्या ध्रुवांजवळच्या उंचावरच्या मातीत, विषुववृत्तावरच्या उंच प्रदेशातल्या मातीपेक्षा सल्फरचं प्रमाण जास्त असू शकतं. शक्यतो खोल ज्वालामुखीच्या मातीपेक्षाही हे प्रमाण जास्त असू शकतं.

advertisement

मराठी बातम्या/देश/
Chandrayan 3 : चांद्रयान 3ची कमाल, डेटा पाहताच जगभरातील वैज्ञानिकांना आश्चर्याचा धक्का; वाचा सविस्तर
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल