चांद्रयान-3 चंद्रावर पोहोण्यापूर्वीची ती शेवटची 17 मिनिटं फार गुंतागुंतीची होती. कारण तोच महत्वाचा टप्पा होता ज्यामध्ये खरी परीक्षा होती आणि या यायानं सॉफ्ट लँडिंग होणं गरजेचं होतं.
त्या 17 मिनिटांत काय काय झालं?
-विक्रम लँडरने 25 किमी उंचीवरून चंद्रावर उतरण्याचा प्रवास सुरू केला. पुढचा टप्पा गाठण्यासाठी त्याला सुमारे 11.5 मिनिटे लागली. म्हणजेच 7.4 किलोमीटर उंचीपर्यंत.
advertisement
-तो 7.4 किमी उंचीवर पोहोचला तोपर्यंत त्याचा वेग 358 मीटर प्रति सेकंद होता. पुढचा दुसरा टप्पा 6.8 किलोमीटरचा होता.
-6.8 किमी उंचीवर, वेग कमी होऊन 336 मीटर प्रति सेकंद झाला. आता तिसरा आणि शेवटचा टप्पा 800 मीटरचा होता.
-चंद्राच्या पृष्ठभागावर उतरताना सॉफ्ट लँडिंगसाठी लँडरचा वेग 1.68 मीटर प्रति सेकंद होता.
Chandrayaan 3 : चंद्रावर लँडिंग करून 24 तास उलटताच चांद्रयान 3 बाबत मोठी अपडेट
आता हे सर्व कसं घडलं ते चांद्रयानातील वित्रम लँडरमधील इमेजेर कॅमेऱ्याने टिपलं आहे. चांद्रयान चंद्राला स्पर्श करण्याआधीचं हे दृश्य इस्रोने शेअर केलं आहे.
अशा प्रकारे चांद्रयान-3 चे चंद्रावर सॉफ्ट लँडिंग झाले आणि भारतानं इतिहास घडवला. भारताचं हे चांद्रयान-3 चंद्राच्या दक्षिणेकडील ध्रुवावर उतरले आहे. ज्या टोकावर आतापर्यंत कोणताही देश पोहोचलेला नाही.