दिल्ली विधानसभेच्या 70 पैकी 48 जागांवर भाजपने बाजी मारली आहे. तर सत्ताधारी आपला फक्त 22 जागांवर विजय मिळवता आलाय. दिल्लीच्या लढाईत काँग्रेस कुठेच दिसली नाही.
जायंट किलर परवेश कुमार; केजरीवालांचा पराभव केल्यानंतर थेट CM पदाच्या शर्यतीत
दिल्लीचे निकाल जाहीर होत असताना काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी वाड्रा या केरळमधील कन्नूर येथे होत्या. जेव्हा पत्रकारांनी त्यांना दिल्लीच्या निकालावर प्रश्न विचारले तेव्हा त्यांनी, 'मला माहिती नाही, मी अजून निकाल पाहिले नाहीत', असे उत्तर दिले.
advertisement
दिल्लीतल्या लाजिरवाण्या पराभवातही काँग्रेस आनंदी; समजून घ्या राजकीय अर्थ
प्रियांका गांधी यांच्यासारख्या पक्षातील सर्वोच्च स्तरावरील नेत्याकडून अशा प्रकारच्या उत्तराने सर्वजण हैराण झाले. फक्त प्रियांका गांधी नाही दिल्ली काँग्रेसमधील काही नेत्यांनी अशा प्रकारच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. अलका लांबा , संदीप दीक्षित यांना देखील काँग्रेसच्या पराभवापेक्षा आपच्या पराभवाचा आनंद जास्त असल्याचे दिसून आले.
स्वबळाचा बार ठरला फुसका!दिल्लीत राष्ट्रवादीला मिळाली बोटावर मोजता येतील इतके मते
दिल्ली विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा झालेला हा सलग चौथा पराभव आहे. त्याआधी सलग 3 निवडणुकीत काँग्रेसने विजय मिळवला होता. आता देखील काँग्रेसला 6.37 टक्के मते मिळाली आहेत.