दिल्लीतल्या लाजिरवाण्या पराभवातही काँग्रेस आनंदी; शून्य जागा तरी 'बाजीगर' कसे? समजून घ्या राजकीय अर्थ

Last Updated:

Congress Delhi Assembly Elections: दिल्लीवर एकेकाळी सत्ता असलेल्या काँग्रेस पक्षाचा सलग चौथ्या निवडणुकीत दारुण पराभव झाला. पक्षाला एकही जागा जिंकता आली नाही. या पराभवानंतर देखली दिल्ली काँग्रेसचे नेते आनंदी आहेत. जाणून घ्या त्याचे कारण...

News18
News18
नवी दिल्ली: देशाची राजधानी नवी दिल्लीवर अखेर भाजपचा झेंडा फडकला. गेल्या 3 विधानसभा निवडणुकीत बाजी मारणाऱ्या आम आदमी पक्षाचा पराभव करून भाजपने दिल्ली काबीज केली. दिल्ली विधानसभेची निवडणुक ही सुरुवातीपासून भाजप विरुद्ध आप अशीच होती. या लढाईत तिसरा पक्ष असलेला काँग्रेसचा पराभव तर निवडणूक जाहीर होण्याआधीच झाला होता. कारण मुळातच काँग्रेसला या निवडणुकीत विजय मिळवायाच नव्हता तर त्यांना आपचा पराभव करायचा होता. काँग्रेसच्या नेत्यांनी देखील याची कबुली दिली. समजून घ्या काँग्रेसच्या या राजकारणाचा अर्थ...
दिल्ली विधासनभा निकालाकडे संपूर्ण देशाचे लक्ष होते. विशेषत:ज्यांना राजकारणात रस आहे असे सर्वजण राजधानीतील घडामोडींवर बारीक लक्ष ठेवून होते. 27 वर्षांनंतर दिल्ली विधानसभेत भाजपचे पुनरागमन झाले आहे. केजरीवाल यांचा पक्ष आता विरोधी बाकांवर बसणार आहे. या सगळ्यात सलग चौथ्या पराभवामुळे काँग्रेस पुन्हा एकदा दिल्ली विधानसभेत दिसणार नाही. पण गंमत म्हणजे या पराभवानंतरही काँग्रेस अंतर्गत स्तरावर समाधानी असल्याचे दिसून येते. इतकेच नाही तर मतमोजणीदरम्यान अलका लांबा यांसारख्या नेत्यांनीही हे उघडपणे व्यक्त केले. संदीप दीक्षित यांचेही यासंदर्भात असेच मत आहे. पण यामागील मुख्य कारण काय आहे, हे बारकाईने समजून घ्यायला हवे.
advertisement
संपूर्ण व्होट बँक ढासळली
खरे तर या सगळ्याचे प्रमुख कारण म्हणजे आम आदमी पक्षाची कमकुवत कामगिरी. काँग्रेसच्या गटाचा असा विश्वास आहे की, दिल्लीत पुन्हा स्वतःला प्रस्थापित करायचे असेल तर 'आप'चे पतन आवश्यक आहे. दिल्लीत एकेकाळी काँग्रेसचे वर्चस्व होते, पण २०१३ नंतर ती जागा 'आप'ने घेतली. काँग्रेसची संपूर्ण मतपेढी 'आप'कडे वळली आणि काँग्रेस निवडणुकीत सातत्याने कमकुवत होत गेली. पण आता 'आप'च्या घसरत्या कामगिरीमुळे काँग्रेसला आशा निर्माण झाली आहे की ते भविष्यात स्वतःला पुन्हा प्रस्थापित करू शकतील.
advertisement
जुने मतदार परत येऊ शकतात
दिल्लीत काँग्रेसची रणनीती अशी आहे की, आम आदमी पक्ष कमकुवत झाला तर त्यांचे जुने मतदार पुन्हा काँग्रेसकडे परतू शकतात. त्यामुळे प्रचारादरम्यान राहुल गांधी यांनी थेट केजरीवालांवर हल्लाबोल केला. मात्र यामुळे विरोधकांच्या इंडिया आघाडीत मतभेद निर्माण होऊ शकतात. काँग्रेस आणि 'आप' जर एकत्र आले असते तर भाजपचा पराभव शक्य झाला असता, असे अनेक मित्रपक्षांना वाटते. यावर स्पष्टीकरण देताना काँग्रेसने म्हटले की, 'आप'नेच युतीसाठी स्वारस्य दाखवले नव्हते. अरविंद केजरीवाल यांनी आधीच सर्व 70 जागांवर उमेदवार जाहीर केले होते, त्यामुळे काँग्रेसच्या वाटा बंद झाल्या होत्या.
advertisement
भाजपचा विजय पण विरोधकही चिंतेत आहेत
भाजपचा हा विजय त्याला दिल्लीत राजकीय बळ देणारा ठरू शकतो. हरियाणा आणि महाराष्ट्रातील यशस्वी कामगिरीनंतर, दिल्लीतील विजय भाजपला 2024 च्या लोकसभा निवडणुकीनंतर पराभवातून सावरण्यासाठी उपयुक्त ठरू शकतो. त्यामुळे बिहार आणि पश्चिम बंगालमध्ये विरोधकांसाठी अडचणी निर्माण होऊ शकतात. आणि भाजपला बळकटी मिळू शकते.
advertisement
मग दिल्लीत काँग्रेसची रणनीती काय असेल?
2015 मध्ये दिल्लीत काँग्रेसच्या मतांची टक्केवारी 10% च्या खाली गेली होती, तर 2020 मध्ये ती केवळ 4.26% होती. यंदाही काँग्रेसने 'आप'च्या मतपेढीवर फारसा प्रभाव टाकलेला नाही, असे प्राथमिक आकडेवारीतून दिसत आहे. ज्या जागांवर 'आप'चा भाजपकडून पराभव झाला, तेथे काँग्रेसच्या उमेदवारांना किती मते मिळाली, याचे सखोल विश्लेषण पक्षाकडून करण्यात येणार आहे. 'आप'विरोधातील लोकभावना वाढत असल्याने योग्य वेळी काँग्रेसने आक्रमक प्रचार सुरू केल्याचे पक्षाच्या नेत्यांचे मत आहे. निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात राहुल गांधी आणि प्रियांका गांधी वड्रा यांनी 'आप'वर जोरदार हल्ला चढवला.
advertisement
भविष्यातील राजकारण आणि काँग्रेसच्या आशा
भाजपची एक स्थिर मतपेढी आहे, जी साधारणतः 32% ते 38% दरम्यान राहते आणि काँग्रेसच्या मतपेढीशी ती फारशी ओव्हरलॅप होत नाही. मात्र, काँग्रेसच्या मतदारांनी 'आप'कडे आपला कल वळवला आहे. त्यामुळे काँग्रेसला दिल्लीत पुनरागमन करायचे असेल तर 'आप'ला कमकुवत करणे गरजेचे आहे. आणि या निवडणुकीत नेमके तेच घडले आहे. त्यामुळे काँग्रेस किमान एका टप्प्यावर स्वतःला दिलासा देऊ शकते. अलका लांबा म्हणाल्या होत्या की, "ज्यांनी दिल्लीतील काँग्रेसला संपवले, ते आता स्वतःच संपुष्टात येत आहेत." संदीप दीक्षित यांनीही भाजपचा विजय स्वीकारला.
advertisement
'आप'चे अस्तित्व धोक्यात?
'आप' हा एका चळवळीतून उदयास आलेला पक्ष आहे आणि त्याच्याकडे कोणतेही ठोस संघटनात्मक बळ नाही, असा काही राजकीय विश्लेषकांचा तर्क आहे. सत्तेबाहेर राहिल्यास त्यांचे अस्तित्व टिकवणे कठीण जाऊ शकते. यंदाच्या निवडणुकीत मुस्लिम मतदारांनी 'आप'ला संपूर्णपणे पाठिंबा दिलेला नाही, हेही वास्तव आहे. मात्र, 'आप' कमकुवत झाल्यास ते मत काँग्रेसकडे परत येऊ शकते. दिल्लीतील पराभव काँग्रेससाठी धक्का असला तरी 'आप'च्या कमकुवत कामगिरीमुळे पक्षासमोर भविष्यासाठी संधी निर्माण झाली आहे. मात्र, हा प्रभाव केवळ दिल्लीपुरताच मर्यादित राहील.
मराठी बातम्या/देश/
दिल्लीतल्या लाजिरवाण्या पराभवातही काँग्रेस आनंदी; शून्य जागा तरी 'बाजीगर' कसे? समजून घ्या राजकीय अर्थ
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement