NCP Delhi Results: दिल्लीत अजित पवारांचा स्वबळाचा बार ठरला फुसका! राष्ट्रवादीला मिळाली बोटावर मोजता येतील इतके मते

Last Updated:

Delhi Election Results NCP: दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाला मोठा झटका बसला आहे. सत्ताधारी आपकडून भाजपने सत्ता स्वत:च्या ताब्यात घेतली आहे. या निवडणुकीत रिंगणात उतरलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचा दारुण पराभव झालाय.

News18
News18
नवी दिल्ली: देशाची राजधानी नवी दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल आज शनिवारी जाहीर आहे. ७० जागा विधानसभेत भाजपला स्पष्ट बहुमत मिळत असल्याचे दिसत आहे. तर गेल्या ३ निवडणुकीत विजय मिळवणाऱ्या आम आदमी पक्षाला सत्ता गमावण्याची वेळ आली आहे. दिल्लीतील निवडणुकी ही भाजप विरुद्ध आप अशी झाली होती. पण या शिवाय अन्य काही पक्ष देखील या निवडणुकीत होते. ज्यात काँग्रेस आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसचा देखील समावेश होता.
एकेकाळी दिल्लीवर सत्त असलेल्या काँग्रेसला पुन्हा जोरदार झटका बसला आहे. तर महाराष्ट्रात महायुतीत सत्ते असलेले आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस देखील दिल्ली निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. राष्ट्रवादी काँग्रेसने दिल्लीतील ७० पैकी २३ मतदारसंघात उमेदवार उभे केले होते. मात्र या पैकी एकाला विजय तर सोडाच पण डिपॉझिट देखील वाचवता आले नाही. आतापर्यंत झालेल्या मतमजोणीत राष्ट्रवादीला फक्त ०.०३ टक्के मते मिळाली आहेत. दिल्ली निवडणुकीत नोटाला ०.५७ टक्के इतकी मते मिळाली असून राष्ट्रवादीला त्यापेक्षा कमी मते मिळाली आहेत.
advertisement
प्रेमानंद महाराजांवर मथुरेतील लोक नाराज; अनुयायी आणि लोकांमध्ये झाली बाचाबाची
राष्ट्रवादी काँग्रेसने याआधी ही महाराष्ट्राबाहेर निवडणुका लढवल्या होत्या. मात्र त्यांना कधीच फार यश मिळाले नव्हते. २०२०च्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत देखील ते मैदानात उतरले होते. पण तेव्हाही एकही जागा जिंकता आली नव्हती. जुलै २०२३ मध्ये अजित पवार आणि शरद पवार यांच्यात पक्षाची विभागणी झाल्यानंतर दिल्लीत होणारी ही पहिली निवडणूक होती.
advertisement
महाराष्ट्रात भाजपसोबत सत्तेत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दिल्लीत मात्र युती न करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयामागे दिल्लीत पक्षाची वाढ करण्याचे होते.
दिल्ली विधानसभा निवडणुकीत 'आप'चा मोठा धक्का बसला आहे. 'आप'चे सर्वेसर्वा आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासह पक्षाचे सर्व प्रमुख नेत्यांचा पराभव झाला आहे. नवी दिल्ली मतदारसंघातून केजरीवालांचा भाजपच्या परवेश वर्मा यांनी पराभव केला.
मराठी बातम्या/देश/
NCP Delhi Results: दिल्लीत अजित पवारांचा स्वबळाचा बार ठरला फुसका! राष्ट्रवादीला मिळाली बोटावर मोजता येतील इतके मते
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement