चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर दक्षिण मध्य रेल्वेने 144 गाड्या रद्द केल्या आहेत. यातील 118 गाड्या लांब पल्ल्याच्या आहेत. भारतीय हवामान विभागाने चक्रीवादळ माइचोंगबाबत अलर्ट जारी केला आहे. गेल्या काही दिवसांपासून तामिळनाडुत पावसाने तुफान बॅटिंग केली आहे. 4 डिसेंबरला म्हणजेच आज तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीला चक्रीवादळ मिचॉन्ग धडकण्याची शक्यता आहे. तर तामिळनाडुची उत्तर किनारपट्टी, पुद्दुचेरी, कराइकलच्या नागरिकांना 4 डिसेंबरला अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.
advertisement
Weather Update : राज्यात यंदा गुलाबी थंडी नाहीच? हवामान विभागाने दिली महत्त्वाची माहिती
चक्रीवादळ मिचॉन्ग हिंदी महासागरातलं यंदाच्या वर्षातलं सहावं तर बंगालच्या खाडीतलं चौथं वादळ आहे. या चक्रीवादळाला म्यानमारने नावं दिलं होतं. हवामान विभागाने अंदमान, निकोबार बेटासह ओडिशात पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. नेल्लोर आणि मछलीपट्टणम दरम्यान 5 डिसेंबरच्या दुपारपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता आहे. चक्रीवादळाचा कमाल वेग ताशी 80 ते 90 किमीपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.
तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी शुक्रवारी 12 जिल्हा प्रशासन प्रमुखांसोबत आढावा बैठक घेतली. या बैठकीत राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तमिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांनी यावेळी अवश्यक अशा सूचना दिल्या. यासोबतच सर्व संबंधित अधिकाऱ्यांना खबरदारीच्या उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत.