दरम्यान, अरविंद केजरीवालांच्या खास मोहऱ्याला देखील पराभवाचा सामना करावा लागला आहे. दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांचा जंगपुरा विधानसभा मतदारसंघात पराभव झाला आहे. सिसोदिया हे तीन टर्मचे आमदार असून केजरीवाल सरकारमधील ते महत्त्वाचे नेते आहे. दिल्लीतील शिक्षण व्यवस्था सुधारवण्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा होता. मात्र अलीकडेच दिल्ली मद्य धोरण घोटळ्यात मनीष सिसोदिया अडकले. त्यांना जेलवारी देखील झाला.
advertisement
आता या सगळ्यांचा परिणाम निवडणुकीत दिसून आला आहे. मनीष सिसोदिया यांचा 675 मतांनी पराभव झाला आहे. सुरुवातीपासूनच सिसोदिया पिछाडीवर असल्याचं बघायला मिळालं होतं. मधल्या काळात त्यांना जेमतेम लीड मिळालं होतं. मात्र अंतिम मतमोजणीत त्यांचा पराभव झाला आहे.
जंगपुरा विधानसभा मतदारसंघात आपच्या मनीष सिसोदिया यांचा सामना भाजपच्या तरविंदर सिंह यांच्यासोबत झाला होता. अटीतटीच्या या लढतात तरविंदर सिंह यांनी विजय मिळवला आहे. त्यांना 38 हजार 859 मतं मिळाली. तर सिसोदिया यांना 38 हजार 184 मतं मिळाली. या निवडणुकीत सिसोदिया यांचा 675 मतांनी पराभव झाला आहे.