सध्या गुप्तचर संस्थांनी दिल्ली पोलिसांना याबाबतची माहिती दिली आहे. यानंतर पोलीस सतर्क झालेत आहेत. सध्या अरविंद केजरीवाल यांना झेड प्लस सुरक्षा प्रदान करण्यात आली आहे. या अलर्टनंतर त्यांची सुरक्षा आणखी वाढवता येऊ शकते. सध्या, अरविंद केजरीवाल यांच्या मागावर असणारे खलिस्तानी नेमके कोण आहेत आणि त्यांचा हेतू काय आहे? याची माहिती अद्याप मिळाली नाही.
advertisement
खरंतर, अरविंद केजरीवाल यांच्यावरील संभाव्य हल्ल्याची बातमी अशा वेळी समोर आली आहे, जेव्हा दिल्लीत विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या आहेत. ते सध्या निवडणूक सभांमध्ये व्यस्त आहेत. आम आदमी पक्षाचा विजय सुनिश्चित करण्यासाठी ते दिवसरात्र प्रचार करत आहेत. आम आदमी पक्ष विजयाची हॅट्रिक करण्यासाठी उत्सुक आहे. यावेळी ते भाजप आणि काँग्रेस दोघांशीही स्पर्धा करत आहेत.
दिल्लीत निवडणूक कधी आहे?
दिल्ली विधानसभेची निवडणूक त्रिशंकू आहेत. भाजपसोबतच काँग्रेसही आम आदमी पक्षाला जोरदार टक्कर देत आहे. दिल्लीत ५ फेब्रुवारी रोजी मतदान होणार असून ८ फेब्रुवारी रोजी निकाल जाहीर होणार आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे पंजाबमध्ये आम आदमी पक्षाचे सरकार आहे. अशात आता पंजाबमधूनच केजरीवाल यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर अरविंद केजरीवाल खलिस्तान्यांच्या टार्गेटवर आल्यानं त्यांच्यावर अनेक मर्यादा येऊ शकतात.