सीबीआय, ईडीने जामीन याचिकेला विरोध करताना सर्वोच्च न्यायालयात म्हटलं की, बीआरएस नेता कविता यांनी त्यांचा फोन फॉरमॅट करण्याचा आरोप खोटा आहे. सर्वोच्च न्यायालयाने तपास यंत्रणांना विचारलं की, बीआरएस नेता के कविता गुन्ह्यात सहभागी असल्याचा काय पुरावा आहे. के कविता यांना जामीन देताना न्यायालयाने हेसुद्धा स्पष्ट केलं की, मेरिटवर कोणत्याही प्रकारची टिप्पणी केलेली नाही. यामुळे ट्रायलवर कोणताही परिणाम होणार नाही.
advertisement
बीआरएसच्या नेत्या के कविता यांच्या जामीन अर्जाच्या याचिकेवर आज सुनावणी झाली. गेल्या पाच महिन्यांपासून याचिकाकर्त्या के कविता तुरुंगात आहे. या खटल्याची सुनावणी लगेच होणंही अशक्य आहे असं म्हणत सर्वोच्च न्यायालयाने के कविता यांना जामीन मंजूर केला. न्यायमूर्ती बीआर गवई आणि न्यायमूर्ती केवी विश्वनाथ यांच्या पीठासमोर जामीन याचिकेवर सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने त्या पाच महिन्यांपासून तुरुंगात असल्याचं म्हटलं. ईडी सीबीआयने सिसोदिया आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याप्रमाणेच के कविता यांचाही दारु घोटाळ्यात हात असल्याचा दावा केला होता.
के कविता यांच्यावतीने वकील मुकुल रोहतगी यांनी न्यायालयात म्हटलं की, के कविता यांच्या दोन्ही तपास यंत्रणांनी चौकशी केलीय. दोन्ही प्रकरणातील सहआरोपी मनीष सिसोदिया यांनाही न्यायालयाने जामीन दिला असल्याचा दाखला के कविता यांचे वकील मुकुल रोहतगी यांनी दिला.
