व्हिडीओ पाहा
लाल किल्ला परिसर हा दिल्लीतील सर्वाधिक गर्दीचा आणि सुरक्षा व्यवस्थेने भरलेला भाग आहे. त्यामुळे या स्फोटानंतर लगेचच पोलिसांनी परिसर सील केला आहे.
बम निष्क्रिय पथक (Bomb Squad) आणि अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले आहेत.
व्हिडीओ पाहा
वाहतुकीसाठी गेट क्रमांक 1 च्या आसपासचा भाग बंद करण्यात आला असून, नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचं काम सुरू आहे.
मेट्रो स्टेशन आणि आसपासच्या भागातील सुरक्षा तपासणी अधिक कडक करण्यात आली आहे.
स्फोटाचं कारण अद्याप अस्पष्ट
सध्या पोलिस आणि फॉरेन्सिक टीमकडून स्फोटाचे कारण आणि वापरलेलं साहित्य याची तपासणी सुरू आहे.
कार मालकाची ओळख आणि परवानगी तपासली जात आहे. आतापर्यंत एक मृत्यू झाल्याचं सांगितलं जातं. पण जखमी किंवा मृत्यूच्या संख्यांची अधिकृत पुष्टी झालेली नाही, मात्र पोलिसांनी सांगितलं की तपास सुरू आहे आणि अधिकृत माहिती नंतर दिली जाईल.
नागरिकांसाठी सूचना
पोलिसांनी नागरिकांना लाल किल्ला आणि जवळच्या मेट्रो स्थानकांपासून सध्या दूर राहण्याचं आवाहन केलं आहे.
कोणतीही संशयास्पद वस्तू, हालचाल किंवा गर्दी दिसल्यास तात्काळ 112 वर किंवा जवळच्या सुरक्षाकर्मीला कळवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
या घटनेनंतर राजधानी दिल्लीमध्ये सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
पोलिसांकडून पुढील माहिती लवकरच दिली जाणार आहे.
