TRENDING:

Election Commission On Rahul Gandhi: राहुल गांधींच्या आरोपांची बत्ती निवडणूक आयोगाने विझवली, 5 मुद्यांमध्ये दिलं प्रत्युत्तर

Last Updated:

Election Commission On Rahul Gandhi: विरोधी पक्षनेते राहुल गांधी व्होट चोरीचा आरोप करत केंद्रीय निवडणूक आयोगाला थेट लक्ष्य केले. केंद्रीय निवडणूक आयोगाने राहुल गांधींच्या आरोपावर स्पष्टीकरण दिले आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नवी दिल्ली: विरोधी पक्षनेते राहुल गांधी व्होट चोरीचा आरोप करत केंद्रीय निवडणूक आयोगाला थेट लक्ष्य केले. राहुल गांधी यांनी आजच्या पत्रकार परिषदेत पुराव्यासह मतदारांची नावे जाणिवपूर्वक वगळण्यात आल्याचा आरोप केला. त्यानंतर आता केंद्रीय निवडणूक आयोगाने राहुल गांधींच्या आरोपावर स्पष्टीकरण दिले आहे.
राहुल गांधींच्या आरोपांची बत्ती निवडणूक आयोगाने विझवली, पाच मुद्यांमध्ये दिलं प्रत्युत्तर
राहुल गांधींच्या आरोपांची बत्ती निवडणूक आयोगाने विझवली, पाच मुद्यांमध्ये दिलं प्रत्युत्तर
advertisement

राहुल गांधी यांनी आज नवी दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. मुख्य केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश्वर कुमार यांनी कशी व्होट चोरांना लोकशाहीविरोधातील लोकांना कशी मदत केलीय, मतचोरी कशी झाली, मते कशी बदलली हे पुराव्यानिशी मांडणार असल्याचे राहुल गांधी यांनी सांगितले. राहुल गांधी यांनी कर्नाटकमधील आळंद मतदारसंघातून 6018 मतदारांची नावं वगळण्यात आली. मतदारांना कल्पनाच नाही की त्यांची नावे मतदारयादीतून वगळण्यात आली आहे. दलित, अल्पसंख्याक मतदारांची नावे मतदारयादीतून जाणीवपूर्वक वगळण्यात आली. यात विशेषत: काँग्रेसच्या मतदारांची नावे वगळण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. कर्नाटक बाहेरील मोबाइल क्रमांकावरून मतदारांची नावे वगळण्यात आली. अर्ज कोणी केले, ओटीपी कोणाला गेले, हे सगळं संशयास्पद असल्याचे राहुल गांधी यांनी सांगितले. सुर्यकांत नावाच्या व्यक्तीने 14 मिनिटांत 12 नावे वगळले असल्याचे सांगितले.

advertisement

निवडणूक आयोगाने काय म्हटले?

केंद्रीय निवडणूक आयोगाने विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या आरोपावर 5 मुद्यांसह उत्तरे दिली. राहुल गांधी यांनी केलेले आरोप चुकीचे आणि निराधार असल्याचे निवडणूक आयोगाने म्हटले. कोणलाही, कोणत्याही मतदाराला ऑनलाइन पद्धतीने कोणतेही मत वगळता येणार नसल्याचे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले. निवडणूक आयोगाने पुढे म्हटले की, संबंधित व्यक्तीला आपले म्हणणे मांडण्याची संधी दिल्याशिवाय कोणतेही मत वगळता येणार नाही.

advertisement

निवडणूक आयोगाने म्हटले की, 2023 मध्ये आळंद विधानसभा मतदारसंघातील मतदार वगळण्याचे काही अयशस्वी प्रयत्न करण्यात आले होते. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनीच एफआयआर दाखल केला असल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली.

आळंद विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत 2023 मध्ये काँग्रेसचे बी. आर. पाटील विजयी झाले. तर, 2018 मध्ये भाजपचे सुभाष गुट्टेदार विजयी झाले.

advertisement

मराठी बातम्या/देश/
Election Commission On Rahul Gandhi: राहुल गांधींच्या आरोपांची बत्ती निवडणूक आयोगाने विझवली, 5 मुद्यांमध्ये दिलं प्रत्युत्तर
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल