TRENDING:

अहमदाबाद विमान दुर्घटनेत पहिला खटला, कोर्टात हादरवणारा दावा; नातेवाईकांचा बोईंग आणि हनीवेलवर गंभीर आरोप

Last Updated:

Air India Flight: अहमदाबाद-लंडन एअर इंडिया फ्लाइटच्या भीषण अपघातात 260 जणांचा मृत्यू झाला होता. या दुर्घटनेत मृतांच्या कुटुंबीयांनी अमेरिकेत बोईंग आणि हनीवेलविरोधात खटला दाखल करत दोषपूर्ण इंधन स्विचला जबाबदार ठरवले आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
News18
News18
advertisement

अहमदाबाद: 12 जून रोजी अहमदाबाद येथून लंडनला निघालेल्या एअर इंडियाच्या विमानाला अपघात होऊन 260 लोकांचा मृत्यू झाला होता. या दुर्घटनेतील चार मृतांच्या कुटुंबीयांनी अमेरिकेतील डेलावेअर न्यायालयात बोईंग आणि हनीवेल कंपन्यांविरोधात खटला दाखल केला आहे. कथित दोषपूर्ण इंधन स्विचमुळे हा अपघात झाल्याचा आरोप या खटल्यात करण्यात आला आहे. मात्र यूएस फेडरल एव्हिएशनडमिनिस्ट्रेशन (FAA) नुसार या स्विचमुळे अपघात झाल्याचे दिसून येत नाही.

advertisement

रॉयटर्सच्या वृत्तानुसार डेलावेअरच्या सुपीरियर कोर्टात दाखल केलेल्या या खटल्यात बोईंग आणि हनीवेल कंपन्यांना अपघातासाठी जबाबदार धरण्यात आले आहे. हनीवेलने हे स्विच तयार केले होते. फ्लाईट 171 ने अहमदाबादहून उड्डाण घेतल्यानंतर काही सेकंदातच हा अपघात झाला.

advertisement

खटल्यातील फिर्यादींनी 2018 च्या एफएएच्या एका सल्ल्याचा हवाला दिला आहे. यामध्ये काही बोईंग मॉडेल्सच्या ज्यात 787 विमानाचा समावेश आहे. ऑपरेटर्सना इंधन कटऑफ स्विचच्या लॉकिंग यंत्रणेची तपासणी करण्याची शिफारस करण्यात आली होती, जेणेकरून ते चुकून हलणार नाहीत. मात्र ही शिफारस बंधनकारक नव्हती.

advertisement

या अपघातासंदर्भात अमेरिकेतील हा पहिलाच खटला असल्याचे सांगितले जात आहे. यात मरण पावलेल्या कांताबेन धीरूभाई पघडल, नाव्या चिराग पघडल, कुबेरभाई पटेल आणि बाबीबेन पटेल यांच्या मृत्यूसाठी नुकसान भरपाईची मागणी करण्यात आली आहे, परंतु त्याची रक्कम नमूद केलेली नाही. या अपघातात 229 प्रवासी, 12 क्रू मेंबर्स आणि जमिनीवर 19 लोकांचा मृत्यू झाला. एक प्रवासी बचावला होता.

advertisement

तपास अहवालात काय?

भारताच्या एअरक्राफ्टक्सिडेंट इन्वेस्टिगेशन ब्युरो (AAIB) च्या प्राथमिक तपास अहवालानुसार, एअर इंडियाने सुचवलेली तपासणी केली नव्हती. तसेच अपघाताग्रस्त विमानाच्या देखभालीच्या नोंदीनुसार थ्रॉटल कंट्रोल मॉड्यूल, ज्यात इंधन स्विचचा समावेश आहे. ते 2019 आणि 2023 मध्ये बदलण्यात आले होते. अहवालात असेही नमूद करण्यात आले आहे की- विमानावर आणि इंजिनवर सर्व लागू होणारे एअरवर्थिनेस डायरेक्टिव्हज आणि अलर्ट सर्व्हिस बुलेटिन्सचे पालन करण्यात आले होते.

मीडिया रिपोर्ट्स आणि खटला

एका रॉयटर्सच्या वृत्तानुसार, कॉकपिटमधील दोन वैमानिकांमधील संवादाच्या रेकॉर्डिंगवरून असे दिसून येते की कॅप्टनने विमानातील इंधन प्रवाह थांबवला होता.

दरम्यान पीडितांच्या कुटुंबीयांनी दाखल केलेल्या खटल्यात असा दावा करण्यात आला आहे की- हे स्विच कॉकपिटमधील अशा ठिकाणी आहेत जिथे ते चुकून दाबले जाण्याची शक्यता जास्त आहे. ज्यामुळे सामान्य कॉकपिट क्रियाकलापांमुळे अनवधानाने इंधन कटऑफ होऊ शकतो. मात्र हवाई सुरक्षा तज्ञांनी रॉयटर्सला सांगितले आहे की, त्यांच्या स्थानानुसार आणि डिझाइननुसार ते चुकून दाबले जाऊ शकत नाहीत.

मराठी बातम्या/देश/
अहमदाबाद विमान दुर्घटनेत पहिला खटला, कोर्टात हादरवणारा दावा; नातेवाईकांचा बोईंग आणि हनीवेलवर गंभीर आरोप
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल