एका वृत्तसंस्थेशी बोलताना नमिता यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. माझ्या हातात वडिलांच्या अस्थी आहेत. मला बंगळुरूवहून दिल्लीला जायचं आहे. दिल्लीहून पुन्हा देहारादून आणि तिथून हरिद्वारला अस्थी विसर्जन करण्यासाठी जायचं आहे. मात्र इंडिगोने आता नुकतीच अनाउन्समेंट केली की विमानं रद्द करण्यात आली आहेत.
त्यांनी याची याआधी कोणतीही पूर्वकल्पना दिली नव्हती. त्यांनी अचानक फ्लाइट रद्द केली, आज आमच्याकडून कोणतेही विमान उड्डाण होणार नाही. तुम्हाला जर आजच जायचं असेल तर इतर एअरलाइन्सने प्रवास करावा यासाठी फोर्स करत आहेत. मात्र त्यांची तिकीटं 60 ते 70 हजार रुपयांपर्यंत जातात जे आम्हाला परवडणारे नाहीत. आम्ही पाच लोक आहोत.
advertisement
आता इथून जाण्यासाठी ना बसचं तिकीट मिळतंय ना ट्रेनचं. आम्ही ट्रेनचं तिकीट बुक केलं होतं. मात्र जोधपूर राजस्थान आणि मग हरिद्वार असं करत जावं लागलं असतं, आता हरिद्वारला जाणं कठीण झालं आहे. रिफंडही आम्हाला पूर्ण दिला जाणार नाही असं सांगितलं जात आहे.
7 दिवसांनंतर रिफंड दिला जाईल असं इथे सांगितलं जात आहे. माझ्या हातात माझ्या वडिलांच्या अस्थी आहेत ज्या विसर्जित करणं फार महत्त्वाचं आहे. हे बोलताना तीचा कंठ दाटून आला होता. तिने सरकारला विनंती केली की मला काहीतरी अरेंज करून द्या ज्यामुळे मी माझ्या वडिलांच्या अस्थी वेळेत विसर्जित करू शकेन.
