SMS रुग्णालयात भीषण आग
या भीषण आगीच्या दरम्यान, आगीची माहिती मिळताच पोलीस, अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जीवाची बाजी लावून अनेक रुग्णांचे प्राण वाचवले. कॉन्स्टेबल वेदवीर सिंह, हरि मोहन आणि ललित या जवानांनी अक्षरशः आगीच्या ज्वालांमध्ये उड्या घेऊन १० हून अधिक रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना सुरक्षित बाहेर काढले. रुग्णांना सुरक्षित बाहेर काढण्याच्या प्रयत्नात हे जवान स्वतः बेशुद्ध झाले. अनेक पोलीस कर्मचाऱ्यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याने त्यांच्यावर एसएमएस रुग्णालयाच्याच आपत्कालीन विभागात उपचार सुरू आहेत. जवानांच्या या शौर्यामुळे मोठी जीवितहानी टळली.
advertisement
कशी लागली आग डॉक्टरांनी सांगितलं
ज्या आयसीयू विभागात ही आग लागली, तिथे एकूण ११ रुग्ण दाखल होते. आयसीयू आणि सेमी-आयसीयूमध्ये मिळून एकूण 18 रुग्णांवर उपचार सुरू होते. त्यांना तातडीने दुसऱ्या आयसीयू विभागात हलवण्यात आलं. एसएमएस रुग्णालय हे राजस्थानमधील सर्वात मोठे रुग्णालय म्हणून ओळखलं जातं. ट्रॉमा सेंटरचे प्रमुख अनुराग धाकड यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्राथमिक तपासात ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचे समोर आले आहे.
6 जणांचा मृत्यू कसा झाला?
ज्या आयसीयूमध्ये आग लागली, तिथे एकूण 24 रुग्ण भरती होते, त्यापैकी बहुतांश रुग्णांना वाचवण्यात यश आलं. मात्र 6 जणांचा मृत्यू झाला, मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. धाकड यांनी सांगितले की, ज्या रुग्णांचा मृत्यू झाला, त्यांची प्रकृती अत्यंत नाजुक होती. त्यापैकी अधिकतर रुग्ण कोमात होते आणि त्यांना जगण्यासाठी सपोर्ट सिस्टीम गरज होती. त्यामुळे त्यांना सपोर्ट सिस्टीमसह दुसऱ्या ठिकाणी तातडीने हलवणं हा मोठा टास्क होता.