महाकुंभ क्षेत्रात वारंवार आगीच्या घटना
यापूर्वीही महाकुंभ मेळा क्षेत्रात अनेकदा आगीच्या घटना घडल्या आहेत. ९ फेब्रुवारी रोजी सेक्टर-२३ मधील एका अन्न स्टॉलमध्ये आग लागली होती, ज्यामध्ये अनेक मंडप जळून खाक झाले होते. प्राथमिक तपासात गॅस सिलेंडरच्या गळतीमुळे आग लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता.
Viral: शांत समुद्रात घडला थरारक प्रसंग, २४ वर्षीय तरुणाला व्हेलने गिळले, नंतर...
advertisement
त्याचप्रमाणे ७ फेब्रुवारी रोजी सेक्टर-१८ मधील एका शिविराला आग लागली होती, ज्यात अनेक तंबू जळाले. फायर ब्रिगेडच्या तात्काळ हस्तक्षेपामुळे मोठी दुर्घटना टळली.
याआधीही मोठ्या प्रमाणावर नुकसान
३० जानेवारीला सेक्टर-२२ मध्ये १५ टेंट जळून खाक झाले होते.
१९ जानेवारीला सेक्टर-१९ मध्ये एका शिविरातील गवताने पेट घेतल्याने १८ शिविर जळाले होते.
या आगीच्या घटनांमुळे महाकुंभ मेळ्यातील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत. फायर ब्रिगेडने वेळीच कारवाई करत परिस्थिती आटोक्यात आणल्याने प्रत्येक वेळी जीवितहानी टळली.