TRENDING:

Hospital ICU Fire: जिथं जीव वाचवायला गेले, तिथंच मृत्यूनं गाठलं! कटकमध्ये ICU मध्ये भीषण आग, १० जण ठार

Last Updated:

Fire Break Out Hospital : ओडिशातील कटक येथील प्रसिद्ध SCB मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये सोमवारी पहाटे भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
कटक: ओडिशातील कटक येथील प्रसिद्ध SCB मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये सोमवारी पहाटे भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या भीषण दुर्घटनेत १० रुग्णांचा होरपळून आणि गुदमरून मृत्यू झाला असून, ५ जणांची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे.
रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये अग्नितांडव, १० रुग्णांचा मृत्यू , ५ जखमी, ओडिशातील एससीबी मेडिकल कॉलेजमधील घटना
रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये अग्नितांडव, १० रुग्णांचा मृत्यू , ५ जखमी, ओडिशातील एससीबी मेडिकल कॉलेजमधील घटना
advertisement

नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, रुग्णालयाच्या पहिल्या मजल्यावरील ट्रॉमा केअर इमर्जन्सी विभागातील ICU मध्ये पहाटे ३ च्या सुमारास अचानक आग भडकली. ज्यावेळी ही आग लागली, तेव्हा आयसीयूमध्ये अनेक रुग्ण उपचार घेत होते. आगीच्या ज्वाळा आणि धुराचे लोट पाहून रुग्णालयात एकच खळबळ उडाली आणि रुग्णांच्या नातेवाईकांची पळापळ सुरू झाली.

समोर आलेल्या माहितीनुसार, आयसीयूमध्ये ७ रुग्णांचा मृत्यू झाला. तर, दुसऱ्या वॉर्डमध्ये सुरक्षित ठिकाणी नेत असताना तीन जणांचा मृत्यू झाला. ट्रॉमा केअर आयसीयूमध्ये शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
शेतकऱ्याचा नाद खुळा, साडेआठ एकरात आमराई, 80 लाखांची कमाई, संत सावता महाराजांच्या गावचा Video
सर्व पहा

घटनेची माहिती मिळताच रुग्णालयात मदत आणि बचाव कार्य सुरू करण्यात आले. अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. अथक प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले.

मराठी बातम्या/देश/
Hospital ICU Fire: जिथं जीव वाचवायला गेले, तिथंच मृत्यूनं गाठलं! कटकमध्ये ICU मध्ये भीषण आग, १० जण ठार
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल