TRENDING:

accident news : लग्नघरात मृत्यूचं तांडव, हायवा स्कॉर्पिओवर उलटला; 6 जण ठार, 3 गंभीर जखमी

Last Updated:

भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे, या अपघातामध्ये सहा जणांचा मृत्यू झाला असून, तीन जण गंभीर जखमी झाले आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पाटणा : बिहारच्या भागलपूर कहलगाव मुख्य मार्गावर आमापूर परिसरामध्ये सोमवारी रात्री भीषण अपघात झाला आहे. वऱ्हाडाच्या गाडीवर खडीची वाहतूक करणारा हायवा पलटी झाला. या अपघातामध्ये स्कॉर्पिओमध्ये असलेल्या सहा जणांचा जागीच मृ्त्यू झाला आहे. तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना स्थानिकांच्या मदतीनं तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे, हा अपघात सोमवारी रात्री साडेआकराच्या सुमारास घडला आहे.
News18
News18
advertisement

दरम्यान अपघाताची माहिती मिळताच घोघा पोलीस ठाण्याचे पोलीस अपघातस्थळी पोहोचले. त्यांनी जेसीबीच्या मदतीनं खडी हटवण्याचं काम सुरू केलं. मात्र तोपर्यंत खडीच्या ढिगाखाली दबलेल्या सहा जणांचा मृत्यू झाला होता. तर तीन जण गंभीर जखमी झाले. जखमी व्यक्तींना पोलिसांनी तातडीनं स्थानिकांच्या मदतीनं रुग्णालयात दाखल केलं. घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

तीन स्कॉर्पिओ वऱ्हाडाला घेऊन कहलगावला निघाल्या होत्या, मात्र वाटेतच काळाने घाला घातला. दोन स्कॉर्पिओच्या मध्ये असलेल्या स्कॉर्पिओवर खडी वाहतूक करणारा हायवा उलटला, या भीषण अपघातामध्ये सहा जणांचा मृत्यू झाला आहे, तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये दोन मुलांचा देखील समावेश आहे.

advertisement

मराठी बातम्या/देश/
accident news : लग्नघरात मृत्यूचं तांडव, हायवा स्कॉर्पिओवर उलटला; 6 जण ठार, 3 गंभीर जखमी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल