राफेल आणि मेटॉर क्षेपणास्त्रांचा थरार या फॉर्मेशनचे मुख्य आकर्षण ठरले ते म्हणजे अत्याधुनिक राफेल (Rafale) लढाऊ विमान. राफेल विमान यावेळी चक्क 'मेटॉर' (Meteor) या हवेतून हवेत मारा करणाऱ्या जगातील सर्वात घातक क्षेपणास्त्रांनी सज्ज असल्याचे दिसून आले. मेटॉर क्षेपणास्त्रांची उपस्थिती ही भारताच्या बीव्हीआर (Beyond Visual Range) क्षमतेचे थेट प्रदर्शन मानले जात आहे. राफेलसोबतच हवाई दलाची इतर आघाडीची लढाऊ विमाने देखील पूर्ण शस्त्रास्त्रांसह (Fully Armed) आकाशात झेपावली होती.
advertisement
नूर खान एअरबेसवरील कारवाईचा संदर्भ
हवाई दलाने एक्सवर शेअर केलेल्या व्हिडिओच्या सुरुवातीला भारताने केलेल्या हल्ल्याचे रिपोर्टिंगच्या क्लिप आहेत. यात स्थानिक आवाज ऐकू येतात, ज्यामध्ये एक व्यक्ती म्हणते, 'नूर खान एअरबेस' (अटॅक हुआ है नूर खान बेस पे) वर हल्ला झाला आहे. या कारवाईत ज्या विमानांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती, तीच विमाने आज 'सिंदूर फॉर्मेशन'चा भाग होती. यातून भारतीय हवाई दलाने हे स्पष्ट केले आहे की, शत्रूच्या सीमेत घुसून अचूक प्रहार करण्याची क्षमता भारत राखून आहे.
'सिंदूर फॉर्मेशन'चे महत्त्व हवाई दलाने म्हटले आहे की, सिंदूर फॉर्मेशनच्या माध्यमातून आम्ही आमच्या 'सिस्टर सर्व्हिसेस' (भूदल आणि नौदल) सोबत खांद्याला खांदा लावून उभे आहोत. हवाई दलाची अचूकता आणि वेळेचे महत्त्व राखत केलेली कामगिरी युद्धाचे निकाल बदलू शकते, हेच यातून अधोरेखित करायचे होते.
तज्ज्ञांचे मत संरक्षण तज्ज्ञांच्या मते, प्रजासत्ताक दिनी अशा प्रकारे 'लोडेड' (शस्त्रास्त्रांसह) विमानांचे प्रदर्शन करणे, हे भारताच्या बदलत्या लष्करी धोरणाचे प्रतीक आहे. यात दाखवण्यात आलेली 'Precision' आणि शस्त्रास्त्रांची मारक क्षमता ही शेजारील देशांसाठी एक स्पष्ट संदेश आहे.
भारतीय हवाई दलाच्या या 'सिंदूर फॉर्मेशन'ने देशवासियांचा अभिमान द्विगुणित केला असून, सोशल मीडियावर याचे व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहेत.
