TRENDING:

दोनदा घटस्फोट, दोन EX Wife कलेक्टर; आता IAS अवि प्रसाद यांनी उरकला तिसरा शुभविवाह, MP मधील बहुचर्चीत लग्न

Last Updated:

आपल्या कामाचा धडाका आणि बुद्धिमत्तेसाठी ओळखले जाणारे अवि प्रसाद सध्या त्यांच्या तिसऱ्या लग्नामुळे चर्चेत आले आहेत. विशेष म्हणजे, त्यांच्या तिन्ही पत्नी या 'IAS' अधिकारीच आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : आपल्या समाजात सरकारी नोकरी, त्यातही IAS किंवा IPS पद म्हटलं की एक वेगळीच प्रतिष्ठा असते. या पदावर काम करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या कामाची चर्चा तर नेहमीच होते, पण कधीकधी त्यांच्या खासगी आयुष्यातील घडामोडीही सर्वांचे लक्ष वेधून घेतात. सध्या प्रशासकीय वर्तुळात अशाच एका वरिष्ठ सनदी अधिकाऱ्याच्या लग्नाची जोरदार चर्चा सुरू आहे.
IAS अवि प्रसाद यांनी उरकला तिसरा शुभविवाह,
IAS अवि प्रसाद यांनी उरकला तिसरा शुभविवाह,
advertisement

हे अधिकारी आहेत मध्य प्रदेश कॅडरचे IAS अवि प्रसाद. आपल्या कामाचा धडाका आणि बुद्धिमत्तेसाठी ओळखले जाणारे अवि प्रसाद सध्या त्यांच्या तिसऱ्या लग्नामुळे चर्चेत आले आहेत. विशेष म्हणजे, त्यांच्या तिन्ही पत्नी या 'IAS' अधिकारीच आहेत.

IAS अवि प्रसाद यांनी नुकताच त्यांचा तिसरा विवाह 2017 बॅचच्या IAS अधिकारी अंकिता धाकरे यांच्याशी केला. अंकिता धाकरे सध्या राज्य मंत्रालयात उपसचिव (Deputy Secretary) म्हणून कार्यरत आहेत. या दोघांनी 11 फेब्रुवारी 2026 रोजी मध्य प्रदेशातील प्रसिद्ध कूनो नॅशनल पार्क येथे मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत लग्नगाठ बांधली.

advertisement

अवि प्रसाद यांच्या आयुष्यातील हा तिसरा विवाह आहे. याआधी त्यांनी दोनदा लग्न केले होते, मात्र दुर्दैवाने ते दोन्ही संसार फार काळ टिकू शकले नाहीत.

पहिले लग्न: 2014 मध्ये त्यांनी बॅचमॅट IAS रिजू बाफना यांच्याशी लग्न केले होते. मात्र काही काळानंतर त्यांचा घटस्फोट झाला. रिजू बाफना सध्या शाजापूरच्या जिल्हाधिकारी (Collector) आहेत.

advertisement

2. दुसरे लग्न: पहिल्या घटस्फोटानंतर त्यांनी 2016 बॅचच्या IAS मिशा सिंह यांच्याशी दुसरे लग्न केले. लग्नानंतर मिशा सिंह यांनी त्यांचे कॅडर बदलून मध्य प्रदेश केले होते. मात्र हे नातेही 4 वर्षांनंतर संपुष्टात आले. मिशा सिंह सध्या रतलामच्या जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत आहेत.

RBI मॅनेजर ते IAS पर्यंतचा थक्क करणारा प्रवास

अवि प्रसाद यांचा शैक्षणिक आणि व्यावसायिक प्रवास कोणत्याही तरुणासाठी प्रेरणादायी ठरू शकतो. मूळचे उत्तर प्रदेशचे रहिवासी असलेल्या अवि यांनी एकामागून एक अनेक मोठ्या यशोशिखरांना गवसणी घातली आहे:

advertisement

त्यांनी दिल्ली विद्यापीठातून LLB केले, नंतर ते जोधपूरच्या नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीमधून MBA-MBL (बिझनेस लॉ आणि फायनान्स) ची पदवी घेतली आहे.

प्रशासकीय सेवेत येण्यापूर्वी त्यांची RBI मध्ये मॅनेजर म्हणून निवड झाली होती. त्यानंतर 2013 मध्ये त्यांनी UPSC क्रैक करून IPS पद मिळवले. पण त्यांचे ध्येय मोठे होते, म्हणून 2014 मध्ये त्यांनी पुन्हा परीक्षा दिली आणि देशात 12व्या रँकसह IAS अधिकारी बनले.

advertisement

राजकीय वारसा आणि सध्याची जबाबदारी

अवि प्रसाद यांना मोठा राजकीय वारसा देखील लाभला आहे. त्यांचे आजोबा टम्बेश्वर प्रसाद ऊर्फ बच्चा बाबू हे चौधरी चरण सिंह यांच्या सरकारमध्ये मंत्री होते. सध्या अवि प्रसाद मध्य प्रदेशात रोजगार हमी परिषदेचे CEO (मनरेगा आयुक्त) म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सोबतच त्यांच्याकडे वॉटरशेड मिशनचे संचालक आणि PM पोषण शक्ती निर्माणचे राज्य समन्वयक म्हणून अतिरिक्त कार्यभार आहे.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
एकाच शेतात घ्या वेगवेगळी पिकं, सोपी पद्धत अन् उत्पन्नातही वाढ, असा हा फॉर्म्युला
सर्व पहा

खासगी आयुष्यात अनेक चढ-उतार आले तरी अवि प्रसाद यांनी आपल्या कर्तव्याशी कधीही तडजोड केली नाही. एकाच वेळी अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळणाऱ्या या अधिकाऱ्याच्या नवीन आयुष्यासाठी सध्या शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. रील लाईफपेक्षा रिअल लाईफमधील हा 'कलेक्टर' पॅटर्न सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरला आहे.

मराठी बातम्या/देश/
दोनदा घटस्फोट, दोन EX Wife कलेक्टर; आता IAS अवि प्रसाद यांनी उरकला तिसरा शुभविवाह, MP मधील बहुचर्चीत लग्न
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल