विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी काही दिवसांपूर्वीच कर्नाटकमधील एक विधानसभा मतदारसंघात झालेल्या कथित बोगस मतदारांचा पुराव्यांसह आरोप केला होता. त्यानंतर विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत. भाजपने निवडणूक आयोगाच्या संगनमताने लोकसभा निवडणूक जिंकली असल्याचा आरोप विरोधकांनी केला. त्याशिवाय बिहारमध्ये सुरू असलेल्या एसआयआर प्रक्रियेवरही विरोधकांनी गंभीर आक्षेप घेतले आहेत. ही प्रक्रिया खऱ्या मतदारांना वगळण्याचा कट असल्याचा आरोप त्यांनी केला.
advertisement
दिल्ली पोलिसांकडून मोर्चा कोंडी....
कोणत्याही परिस्थितीत निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर मोर्चा काढू न देण्याचा प्रयत्न दिल्ली पोलिसांनी केला. मोर्चासाठी इंडिया आघाडीचे खासदार संसदेच्या परिसरात जमले. त्यावेळी पोलिसांनी संसदेच्या प्रवेशद्वाराजवळच बॅरिकेट लावत खासदारांची कोंडी केली.
महिला खासदार आक्रमक...
पोलिसांनी बॅरिकेट्स लावून मोर्चाला अटकाव केला. मात्र, महिला खासदारांनी बॅरिकेट्सवर चढत निवडणूक आयोगाच्या कार्यालयाकडे कूच करण्याचा प्रयत्न केला.
निवडणूक आयोगावर मोर्चा कशाला?
विरोधकांनी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे ई-व्होटर लिस्टची मागणी केली आहे. त्याशिवाय, मतदानाच्या वेळीचे सीसीटीव्ही फुटेजची मागणीदेखील विरोधकांनी केली आहे. निवडणूक आयोगाची भूमिका संशयास्पद असल्याचा आरोप विरोधकांकडून सातत्याने करण्यात आला.