TRENDING:

National News : मोठी बातमी! दुध, मकासह या वस्तूंवरील आयात शुल्क घटलं; शेतकऱ्यांना बसणार फटका

Last Updated:

National News : मोदी सरकारने महागाईवर नियंत्रण मिळवण्यासाठी काही वस्तूंवरील आयात शूल्क कमी केलं आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारचा तिसरा कार्यकाळ सुरू झाला आहे. यामध्ये वाढत्या महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी पहिलाच मोठा निर्णय घेण्यात आला आहे. मोदी सरकारने बुधवारी टॅरिफ-रेट कोटा (TRQ) अंतर्गत मका, कच्चे सूर्यफूल तेल, मोहरीचे तेल आणि दूध पावडरवरील आयात शुल्क कमी केलं आहे. यामुळे देशात आयात वाढणार असून याचा थेट फटका देशातील शेतकऱ्यांना बसणार आहे.
 दुध पावडर, मकासह या वस्तूंवरील आयात शुल्क घटलं
दुध पावडर, मकासह या वस्तूंवरील आयात शुल्क घटलं
advertisement

दुध पावडर, मका, सुर्यफुल आणि मोहरीच्या तेलावरील आयात शुल्क घटवण्यात आलं आहे. आयात शुल्क घटल्यानं परदेशातून माल अधिक आयात होणार आहे. परदेशी माल आयात झाल्यानं दुध, सोयाबिन, मका उत्पादक देशातील शेतकऱ्यांना मोठा फटका बसणार आहे. आधीच दुधाचे दर पडले असून आता दुधाची पावडर आयात होणार असल्याने ते अधिक पडण्याची भिती शेतकऱ्यांमध्ये आहे.

advertisement

महागाई नियंत्रित करण्यासाठी निर्णय

भारताने 150,000 मेट्रिक टन सूर्यफूल तेल, 500,000 टन मका, 10,000 टन दूध पावडर आणि 150,000 टन मोहरीचे तेल आयात करण्यास परवानगी दिली आहे, असे सरकारने सांगितले. नोव्हेंबर 2023 पासून महागाईचा दर हा 8 टक्क्यांच्या वर राहिला आहे. ह्याच महागाईवर नियंत्रण मिळवण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे.

advertisement

वाचा - 'जादू की झप्पी' ते शेकहँड, राहुल गांधी आणि PM मोदींची नवी केमिस्ट्री!

सरकारने आयातीसाठी राष्ट्रीय डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड (NDDB), नॅशनल कोऑपरेटिव्ह डेअरी फेडरेशन (NCDF), आणि नॅशनल ॲग्रिकल्चरल कोऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (NAFED) यासारख्या सहकारी संस्था आणि सरकारी कंपन्या शॉर्ट-लिस्ट केल्या आहेत. दरम्यान, “सूर्यफूल आणि मोहरीच्या तेलाच्या आयातीला सवलतीच्या दरात परवानगी देण्याची गरज नव्हती,” असे जागतिक व्यापारी संघटनेच्या मुंबईतील डीलरने सांगितले.

advertisement

मराठी बातम्या/देश/
National News : मोठी बातमी! दुध, मकासह या वस्तूंवरील आयात शुल्क घटलं; शेतकऱ्यांना बसणार फटका
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल