TRENDING:

काही तरी मोठे घडणार, भारताची या देशासोबत High Voltage बैठक; गुप्त देवाणघेवाण, 'गलिच्छ खेळ' कायमचा बंद होणार

Last Updated:

High Voltage Meeting: नऊ वर्षांनंतर भारत आणि नेपाळ यांच्यात गृह सचिव पातळीवर दिल्लीत दोन दिवसीय महत्त्वपूर्ण बैठक होत आहे. सीमा सुरक्षा, मानव व अंमली पदार्थ तस्करी, प्रत्यार्पण संधि आणि गुप्तचर सहकार्यावर चर्चा अपेक्षित आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नवी दिल्ली/काठमांडू: भारत आणि नेपाळ यांच्यात नवी दिल्लीत एक महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. काठमांडू पोस्टने दिलेल्या माहितीनुसार, दोन दिवस चालणारी ही बैठक भारत आणि नेपाळच्या गृह सचिवांमध्ये होणार आहे. ही बैठक अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे कारण तब्बल 9 वर्षांनंतर अशी बैठक होत आहे. दोन्ही देशांदरम्यान सीमा, सीमापार गुन्हेगारी, मानव तस्करी, ड्रग्सची तस्करी, गुप्तचर माहितीची देवाणघेवाण, सीमारेषेवरील खांबांची दुरुस्ती आणि प्रत्यार्पण संधीसारख्या मुद्द्यांवर चर्चा होऊ शकते.
News18
News18
advertisement

ही बैठक का महत्त्वाची आहे?

नेपाळचे गृहमंत्री रमेश लेखक यांनी या बैठकीला एक सकारात्मक आणि मोठे पाऊल असे म्हटले आहे. त्यांच्या मते, या बैठकीतून दोन्ही देशांमध्ये अनेक वर्षांपासून अडकलेल्या मुद्द्यांवर नव्याने सुरुवात होऊ शकते. त्यांनी म्हटले, ही बैठक 9 वर्षांनंतर होत आहे.त्यामुळे ती मोठे पाऊल आहे.

भारत-नेपाळकडून कोण सहभागी होणार?

advertisement

अहवालानुसार नेपाळकडून गृह सचिव गोकर्ण मणि द्वावडी आणि भारताकडून गृह सचिव गोविंद मोहन यांच्यात ही बैठक होणार आहे. याशिवाय दोन्ही देशांच्या विविध मंत्रालयांचे आणि सुरक्षा संस्थांचे वरिष्ठ अधिकारी देखील या बैठकीत सहभागी होणार आहेत. नेपाळच्या पंतप्रधान कार्यालय, परराष्ट्र मंत्रालय, कायदा मंत्रालय, सर्वे विभाग, नेपाळ पोलिस, सशस्त्र पोलिस दल आणि गुप्तचर विभागाचे वरिष्ठ अधिकारीही या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.

advertisement

कोणत्या मुद्द्यांवर चर्चा होणार?

नेपाळचे गृहमंत्री म्हणाले की, आंतरराष्ट्रीय सीमा निश्चित करण्यासाठी एक वेगळी यंत्रणा आहे. तर गृह सचिवांच्या नेतृत्वाखालील यंत्रणा सीमापार गुन्हेगारी, ड्रग्स आणि मानव तस्करी यावर नियंत्रण आणण्यावर लक्ष केंद्रित करेल. या बैठकीत दोन्ही देशांच्या सुरक्षा यंत्रणा आणि स्थानिक प्रशासन यांच्यात सहकार्य कसे वाढवता येईल, यावरही चर्चा होईल.

advertisement

एक मोठा मुद्दा म्हणजे प्रत्यार्पण संधि (Extradition Treaty) आणि परस्पर कायदेशीर मदत (Mutual Legal Assistance). यावर यापूर्वीही चर्चा झाली आहे. पण अद्याप अंतिम करार होऊ शकलेला नाही. प्रत्यार्पण संधि 2005 पासून प्रलंबित आहे. नेपाळच्या गृह मंत्रालयाचे प्रवक्ते रामचंद्र तिवारी म्हणाले, परस्पर कायदेशीर मदतीच्या प्रस्तावावर आम्ही आमचे मत दिले आहे. पण अजून साइन करण्याच्या टप्प्यावर पोहोचलो नाही. चर्चा योग्य दिशेने सुरू आहे.

advertisement

ते पुढे म्हणाले की, ही बैठक पहलगाम येथे झालेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर आणि त्यानंतर भारताने नेपाळकडे सीमेवर कडक नजर ठेवण्याची विनंती केल्यानंतर होत आहे. त्यामुळे आम्हाला आशा आहे की भारत दहशतवाद, सीमेद्वारे संशयित लोकांची हालचाल आणि नेपाळच्या सीमावर्ती भागात मदरशांची वाढती संख्या यासारख्या मुद्द्यांवर चर्चा करेल.

-सीमापार गुन्हेगारी आणि संशयास्पद हालचालींवर संयुक्त गस्त आणि नजर ठेवण्याबाबत चर्चा होऊ शकते.

-सीमावर्ती भागांमध्ये ड्रग्स आणि मानव तस्करी रोखण्यासाठीही चर्चा होईल.

-भारत आणि नेपाळमधील सीमारेषेवरील खांबांची दुरुस्ती आणि पायाभूत सुविधांचे उन्नतीकरण हे देखील चर्चेचे विषय असू शकतात.

-ICP (इंटिग्रेटेड चेक पोस्ट), रस्ते आणि रेल्वे नेटवर्क अधिक चांगले करण्यावरही चर्चा होऊ शकते.

-बनावट चलनाच्या तस्करीवर नियंत्रण आणि तपासणीसाठी फॉरेन्सिक सहकार्यही या बैठकीच्या अजेंड्यावर असू शकते.

प्रत्यार्पण संधीत अडथळा काय?

2005 मध्ये भारत-नेपाळने प्रत्यार्पण संधिचा प्रारंभिक मसुदा तयार केला होता. पण यामध्ये "तिसऱ्या देशाच्या नागरिकांना हस्तांतरित करणे" यासारख्या अटींवर मतभेद असल्यामुळे आजतागायत अंतिम करार होऊ शकलेला नाही. तिसऱ्या देशाचा नागरिक म्हणजे असा व्यक्ती जो ना भारताचा आहे ना नेपाळचा, तर इतर कुठल्या तरी देशाचा आहे. ही संधि अंतिम झाली तर पाकिस्तानसाठी सर्वात मोठा धक्का ठरू शकतो. कारण अनेक वेळा पाकिस्तानच्या समर्थनार्थ असलेले अतिरेकी नेपाळमार्गे भारतात घुसण्याचा प्रयत्न करतात. ही संधि झाल्यास भारताला मोठा फायदा होईल आणि पाकिस्तानला त्याचा गलिच्छ खेळ खेळता येणार नाही.

मराठी बातम्या/देश/
काही तरी मोठे घडणार, भारताची या देशासोबत High Voltage बैठक; गुप्त देवाणघेवाण, 'गलिच्छ खेळ' कायमचा बंद होणार
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल