या क्रमात भारत सरकारने आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. यासाठी सरकारने खजिन्याचे दार उघडले आहे. सरकारने तीन मोठ्या आणि सात अन्य खरेदीला मंजुरी दिली आहे. यामध्ये स्पाय एअरक्राफ्ट, अॅडव्हान्स माईन स्वीपर आणि त्वरीत कृती करणाऱ्या संरक्षण प्रणालींची खरेदी करण्यात येणार आहे. सर्वात मोठी बाब म्हणजे हे सर्व शस्त्रास्त्र देशातच विकसित करण्यात आले आहेत. यामध्ये 12 माईन काउंटरमेजर्स व्हेसल्स आहेत. यांची किंमत सुमारे 44 हजार कोटी रुपये आहे. हे स्पेशलाइज्ड युद्धनौका आहेत. यांची डिस्प्लेसमेंट क्षमता 900 ते 1000 टन इतकी आहे. या जहाजांचा वापर समुद्रात पाण्याखाली टाकलेल्या मायन्स नष्ट करण्यासाठी होतो. युद्धाच्या काळात शत्रू सैन्य समुद्रात मायन्स टाकून बंदरांवर आणि जहाजांवर परिणाम घडवून आणतात.
advertisement
भारताची भौगोलिक स्थिती आणि चीन-पाकिस्तान यांच्यातील वाढते सैन्य सहकार्य पाहता, अशा माईन स्वीपर जहाजांची गरज प्रकर्षाने जाणवत होती. सध्या नौदल ‘क्लिप ऑन माईन काउंटरमेजर्स सूट्स’ वापरत आहे. हे सूट्स काही जहाजांवर लावले जातात. पण आता अॅडव्हान्स मायन्स स्वीपर आपल्या युद्धनौका आणि पाणबुडींच्या पुढे जाऊन त्यांना सुरक्षित मार्ग उपलब्ध करून देतील.
QRSAM साठी 36 हजार कोटी रुपये
त्याचबरोबर सरकारने 36 हजार कोटी रुपये खर्च करून क्विक रिऍक्शन सर्फेस टू एअर मिसाईल (QRSAM) खरेदीला मंजुरी दिली आहे. हे DRDO ने विकसित केले आहे. सेना आणि हवाई दलाला या क्षेपणास्त्रांच्या प्रत्येकी तीन-तीन स्क्वाड्रन मिळतील. भारतीय सेनेने यासाठी 11 रेजिमेंट्सची आवश्यकता सांगितली आहे. या मिसाईल्सना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सहज हलवता येते. या मिसाईल्स शत्रू देशांचे फायटर जेट्स, हेलिकॉप्टर्स आणि ड्रोन यांना ३० किमी अंतरावरून पाडू शकतात. यामुळे भारताच्या मल्टीलिअर डिफेन्स सिस्टीमला अधिक बळ मिळणार आहे. या सिस्टीममध्ये आधीपासूनच S-400 आणि आकाश डिफेन्स सिस्टीमचा समावेश आहे.
तीन ISTAR विमानांची खरेदी
सरकारने तीन ISTAR विमानांच्या खरेदीला मंजुरी दिली आहे. ISTAR चे काम म्हणजे इंटेलिजन्स, सर्व्हेलन्स, टार्गेट शोधणे आणि गुप्तहेरगिरी करणे. यासाठी १० हजार कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. ही विमाने अशा पद्धतीने डिझाइन करण्यात आली आहेत की, ती फायटर जेट्स आणि मिसाईल्सना शत्रूच्या अभेद्य तळांपर्यंत पोहोचवून लक्ष्य भेदण्यात सक्षम बनवतात. या विमानांमध्ये मोठ्या प्रमाणावर देशी सेन्सर्स आणि DRDO ने विकसित केलेली अन्य उपकरणे बसवली गेली आहेत. यामध्ये सिंथेटिक अॅपर्चर रडार, इलेक्ट्रो-ऑप्टिकल आणि इन्फ्रारेड सेन्सर्स आहेत, जे अतिशय सूक्ष्म गुप्त माहिती गोळा करण्यात सक्षम आहेत.