नवी दिल्ली : इस्रोच्या गगनयान मोहिमेची तयारी आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. इस्रोचे अध्यक्ष व्ही. नारायणन यांनी सांगितले की- ‘व्योममित्र’ नावाचा अर्ध-मानव रोबोट यंदाच्या डिसेंबरमध्ये गगनयानची पहिली मानवरहित चाचणी उड्डाण घेऊन जाणार आहे. या मोहिमेला G1 असे नाव देण्यात आले आहे. व्योममित्र हा फक्त रोबोट नाही तर भारताच्या अंतराळ प्रवासाचा पहिला दूत आहे. हा मिशन हे सिद्ध करेल की, भारत सुरक्षित मानवी अंतराळ उड्डाणासाठी किती सज्ज आहे. उद्दिष्ट म्हणजे मानवी अंतराळ प्रवासासाठी लागणाऱ्या महत्त्वाच्या प्रणालींची आधी चाचणी घेणे.
advertisement
काय तपासले जाणार आहे?
-कार्बन डायऑक्साइड, तापमान, दाब आणि आर्द्रता यासारखे पर्यावरणीय घटक तपासले जातील.
- यानाला समुद्रात सुरक्षित उतरवण्यासाठी 9 पॅराशूट लावले गेले आहेत.
-सुरक्षिततेसाठी एस्केप सिस्टमही तयार करण्यात आली आहे.
गगनयान मोहिमेचे नवे वेळापत्रक
-मानवी उड्डाणाचे लक्ष्य आता 2027 च्या पहिल्या तिमाहीत ठेवण्यात आले आहे.
-आतापर्यंत 80% पेक्षा जास्त चाचण्या पूर्ण झाल्या आहेत. उरलेल्या सुमारे 2,300 चाचण्या पुढील काही महिन्यांत घेतल्या जातील.
पुढील टप्पे
G1 (डिसेंबर 2025) : व्योममित्रसह मानवरहित चाचणी उड्डाण.
2026 : आणखी दोन मानवरहित मोहिमा G2 आणि G3 प्रक्षेपित होतील.
या सर्व चाचण्या यशस्वी झाल्यानंतरच मानवाला अंतराळात पाठवण्यास परवानगी मिळेल.
गगनयान मोहिमेतील अलीकडील यश
जुलैमध्ये श्रीहरिकोटा येथील सतीश धवन स्पेस सेंटरमध्ये इस्रोने पहिली इंटीग्रेटेड एअर ड्रॉप टेस्ट (IADT-01) यशस्वीरित्या पूर्ण केली होती. यात 4.8 टन वजनाचा नकली क्रू मॉड्यूल चिनूक हेलिकॉप्टरमधून 3 किमी उंचीवरून सोडण्यात आला होता. त्याला १० पॅराशूट असलेली डीसिलरेशन सिस्टम जोडली होती. टेस्टदरम्यान एसीएस मोर्टारने पॅराशूट उघडले आणि टप्प्याटप्प्याने तीन मुख्य पॅराशूट्स उघडले गेले. यामुळे क्रू मॉड्यूल सुरक्षितरीत्या समुद्रात उतरले. इस्रोने सांगितले की- गगनयान मोहिमेदरम्यान समुद्रात सुरक्षित लँडिंगसाठी हेच सिस्टम वापरले जाईल.
गगनयान का महत्त्वाचे?
या मोहिमेचे उद्दिष्ट भारताला त्या देशांच्या यादीत स्थान मिळवून देणे आहे. ज्यांनी स्वतःच्या बळावर मानवाला अंतराळात पाठवले आहे. जर सर्व चाचण्या यशस्वी झाल्या, तर 2027 मध्ये भारताचा पहिला ‘गगनयात्री’ अंतराळात जाईल आणि सुरक्षित परत येईल. हे भारताच्या इतिहासातील सर्वात मोठे अंतराळ पाऊल मानले जाईल.