'सुदर्शन' म्हणजेच S-400: शत्रूला 380 किमीपूर्वीच धक्का
भारताने रशियाकडून विकत घेतलेली S-400 ट्रायम्फ हवाई संरक्षण प्रणाली आता 'सुदर्शन चक्र' म्हणून ओळखली जाते. ही प्रणाली 380 किलोमीटरपर्यंत शत्रूच्या विमानांचा मागोवा घेऊन त्यांचा विनाश करू शकते. विशेष म्हणजे, ही रडार प्रणाली इतकी प्रगत आहे की स्टेल्थ फायटर जेट्सही – अगदी F-35 सारखे अमेरिकन फायटर – तिच्या नजरेतून सुटत नाहीत. ही प्रणाली भारतीय हवाई दलाच्या 'इंटिग्रेटेड एअर कमांड अँड कंट्रोल सिस्टम'चा (IACCS) भाग बनली आहे.
advertisement
'आकाश'
DRDOने विकसित केलेली ‘आकाश’ क्षेपणास्त्र प्रणाली देखील भारताच्या हवाई संरक्षणात मोलाची भूमिका बजावते. २५ किमी अंतरावर असलेल्या अनेक धोक्यांना ड्रोन, क्रूझ क्षेपणास्त्र, लढाऊ विमानं, हेलिकॉप्टर्स एकाचवेळी नष्ट करण्याची ही क्षमता आहे. ही प्रणाली भारतीय लष्कर आणि हवाई दल दोघांकडे वापरली जाते.
इस्रायलसोबत विकसित ‘बराक-8’: मध्यम पल्ल्यातील घातक कवच
‘बराक-8’ ही भारत-इस्रायल संयुक्त प्रकल्पातून विकसित केलेली MRSAM प्रणाली आहे, जी 70 किमीपर्यंतचं लक्ष्य अचूकपणे उद्ध्वस्त करू शकते. अलीकडेच या प्रणालीची भारतीय लष्कराने यशस्वी चाचणी केली. त्यामुळे भारताकडे आज जागतिक दर्जाचं एअर डिफेन्स नेटवर्क उभं राहिलं आहे.
SPYDER प्रणाली: वेगवान आणि अचूक
इस्रायल निर्मित ‘SPYDER’ ही लघुपल्ल्याची, वेगवान प्रतिसाद देणारी क्षेपणास्त्र प्रणाली आहे. तिची मारा क्षमता १५ किमीपर्यंत असून ‘पायथॉन’ आणि ‘डर्बी’ ही क्षेपणास्त्रं धूरविरहित प्रणोदन प्रणालीमुळे लक्ष्यावर अधिक प्रभावीपणे आदळतात. हे क्षेपणास्त्र हवेत झपाट्याने जाते, पण त्याचा मागोवा घेणं कठीण होतं, कारण त्यामागे धुराचा माग उरत नाही. ही प्रणाली लष्कराला अचूक मारा करण्याची ताकद देते.
पाकिस्तानकडून धोका, पण भारत सज्ज
सध्या भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर या अत्याधुनिक क्षेपणास्त्र प्रणाली लष्कराला आणि हवाई दलाला संघर्षातही आपल्या सीमारेषा सुरक्षित ठेवण्याची ताकद भारताकडे आहे. भारताकडे केवळ हल्ला करण्याची नाही तर शत्रूनं केलेला हल्ला उधळून लावण्याची ताकदही आहे. आपली डिफेन्स सिस्टिम मजबूत आहे.