मिळालेल्या माहितीनुसार, आजपासून कॅनडाहून भारतात येण्यासाठीची व्हिसा सेवा बंद करण्यात आली आहे. पुढील आदेश येईपर्यंत सेवा बंद ठेवण्यात आल्या आहेत. याअंतर्गत कॅनडाचा व्हिसा घेऊन भारतात येऊ इच्छिणाऱ्यांसाठी व्हिसा सेवा बंद करण्यात आली आहे. नोटीसमध्ये असे लिहिलं आहे की, “भारतीय मिशनकडून महत्त्वाची माहिती: ऑपरेशनल कारणांमुळे, 21 सप्टेंबर 2023 (गुरुवार) पासून पुढील सूचना मिळेपर्यंत भारतीय व्हिसा सेवा निलंबित करण्यात आल्या आहेत.”
advertisement
Gangster Sukha Duneke: भारतातून फरार झालेल्या आणखी एका खलिस्तानी दहशतवाद्याची कॅनडात हत्या
हे लक्षात घेण्यासारखं आहे, की कॅनडातील वाढत्या भारतविरोधी कारवाया आणि राजकीयदृष्ट्या समर्थित द्वेषपूर्ण गुन्हे तसंच गुन्हेगारी हिंसाचार लक्षात घेत भारताने बुधवारी स्वतः आपल्या नागरिकांना आणि तिथे प्रवास करणार्यांना "अत्यंत सावधगिरी" बाळगण्याचा सल्ला दिला होता.
जूनमध्ये खलिस्तानी फुटीरतावादी नेता हरदीपसिंग निज्जर याच्या हत्येमध्ये भारतीय एजंट्सचा "संभाव्य" सहभाग असल्याचा कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी आरोप केला. या आरोपानंतर दोन्ही देशांमधील राजनैतिक संबंध बिघडत असताना परराष्ट्र मंत्रालयाकडून (MEA) हा सल्ला देण्यात आला आहे.
भारताने मंगळवारी हे आरोप खोटे म्हणून फेटाळून लावले. अॅडव्हायझरीमध्ये परराष्ट्र मंत्रालयाने कॅनडातील भारतीय विद्यार्थ्यांना अत्यंत सावधगिरी बाळगण्यास आणि सतर्क राहण्यास सांगितले होते. या मुद्द्यावर भारत पाश्चिमात्य देशांतील अनेक सामरिक भागीदारांच्या संपर्कात असल्याचेही कळते.