TRENDING:

Indian Navy Jawan Arrest: भारतीय नौदलाचा जवानच निघाला 'ISI'चा एजंट! आग्रातून अटक, युद्धनौकांची गुपिते पाकिस्तानला विकली?

Last Updated:

ISI Agent Arrest In Agra: भारतीय नौदलात 'लान्स नायक' पदावर कार्यरत असलेल्या एका जवानाला पाकिस्तानची गुप्तचर संस्था 'ISI' साठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
आग्रा: उत्तर प्रदेश दहशतवाद विरोधी पथकाने (UP ATS) देशाच्या सुरक्षेला खिंडार पाडणारा एक मोठा कट उधळून लावला आहे. भारतीय नौदलात 'लान्स नायक' पदावर कार्यरत असलेल्या एका जवानाला पाकिस्तानची गुप्तचर संस्था 'ISI' साठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. आदर्श कुमार ऊर्फ लकी असे या २४ वर्षीय आरोपीचे नाव असून, त्याच्या अटकेमुळे संरक्षण दलात खळबळ माजली आहे.
भारतीय नौदलाचा जवानच निघाला 'ISI'चा एजंट! आग्रातून अटक, युद्धनौकांची गुपिते पाकिस्तानला विकली?
भारतीय नौदलाचा जवानच निघाला 'ISI'चा एजंट! आग्रातून अटक, युद्धनौकांची गुपिते पाकिस्तानला विकली?
advertisement

नेमकं प्रकरण काय?

मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, युपी एटीएसने गेल्या काही दिवसांपासून इलेक्ट्रॉनिक सर्व्हिलन्सद्वारे एका संशयास्पद हालचालीवर लक्ष ठेवले होते. तपासाअंती, आग्र्याचा रहिवासी असलेला आदर्श कुमार हा पाकिस्तानमधील हँडलर्सच्या सतत संपर्कात असल्याचे निष्पन्न झाले. १० मार्च २०२६ रोजी एटीएसने सापळा रचून त्याला बेड्या ठोकल्या आणि न्यायालयात हजर केले, जिथून त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

advertisement

कोची नेव्हल कमांडमधून माहितीची चोरी

आरोपी आदर्श कुमार हा केरळमधील कोची येथील 'दक्षिण नेव्हल कमांड'मध्ये तैनात होता. नौदलात कार्यरत असताना त्याने काही माहिती आयएसआयला दिल्याचे समोर आले आहे. एटीएसनुसार,

त्याने भारतीय युद्धनौकांच्या (Warships) अत्यंत संवेदनशील फोटो पाकिस्तानला पाठवल्या. नौदलाच्या धोरणात्मक हालचालींची माहिती 'ISI' एजंटना पुरवली असून या बदल्यात त्याला मोठ्या प्रमाणावर आर्थिक लाभ मिळाल्याचा संशय आहे.

advertisement

एटीएसला मिळाले महत्त्वाचे पुरावे

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
कांद्याच्या दरात पुन्हा तेजी, केळी आणि द्राक्षाला काय मिळाला भाव? Video
सर्व पहा

आरोपीकडून जप्त करण्यात आलेल्या मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणांमध्ये अनेक धक्कादायक पुरावे मिळाले आहेत. पाकिस्तानमधील हस्तकांशी त्याचे असलेले चॅटिंग आणि शेअर केलेले फोटो देशाच्या सुरक्षेसाठी धोकादायक ठरू शकतात. एटीएस आता या प्रकरणाच्या मुळाशी जात असून, या रॅकेटमध्ये नौदलातील अजून कोणी सामील आहे का, याचा शोध घेत आहे.

advertisement

मराठी बातम्या/देश/
Indian Navy Jawan Arrest: भारतीय नौदलाचा जवानच निघाला 'ISI'चा एजंट! आग्रातून अटक, युद्धनौकांची गुपिते पाकिस्तानला विकली?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल