वाराणसी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या “वेडिंग इन इंडिया” या मोहिमेचा परिणाम आता दिसून येत आहे. महाशिवरात्रीला उत्तरप्रदेशातील वाराणसी येथे एका इटालियन जोडप्याचा भारतीय परंपरेनुसार विवाहसोहळा पार पडला. यावेळी दोघांनी सात जन्म एकत्र राहण्याचा निर्णय घेतला. पाउले आणि ग्राजिया असे या दाम्पत्याचे नाव आहे.
इटलीचे पाउले व्यवसायाने डॉक्टर आहे, तर ग्राजिया एक योग शिक्षिका आहे. काशीमध्ये परदेशी जोडप्यांचे लग्न ही बाब गोष्ट नाही. याआधीही गंगेच्या काठावर अनेक लग्ने झाली आहेत. मात्र, अलीकडे त्याची क्रेझ झपाट्याने वाढत आहे.
advertisement
इटलीचे पाउले यांनी इटलीतीलच योग टीचर ग्राजिया यांच्यासोबत लग्न केले. पण मला हिंदू रितीरिवाजांनुसार लग्न करण्याची इच्छा आहे, असे ग्रेझियाने तिचा गुरु भाऊ विजय बाजपेयी यांना सांगितले होते. त्यानंतर विजय बाजपेयींनी महाशिवरात्रीच्या दिवशी लग्न करण्याचा सल्ला दिला. यानंतर दोघांनी सनातन रितीरिवाजाप्रमाणे लग्न केले. या वेळी वेदमंत्रांचा गुंजन होत राहिला. त्याचवेळी ग्राजियाचे गुरु भाई विजय यांनीही तिला मंत्रांचा अर्थ सांगितला.
3 मार्चला झाले इटलीत लग्न -
गेल्या 10 वर्षांपासून पाउले आणि ग्राजिया एकमेकांसोबत राहत होते. मात्र, हिंदू रितीरिवाज आणि आस्था पाहून दोघांनीही वाराणसीत लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली. विशेष म्हणजे, 3 मार्च रोजी दोघांनी इटलीमध्ये ख्रिश्चन धर्मानुसार लग्न केले. यानंतर दोघेही वाराणसीला आले आणि महाशिवरात्रीला त्यांनी सनातन धर्माच्या रितीरिवाजानुसार पुन्हा सात फेरे घेऊन त्यांनी लग्न केले.
पद्मा देवी बनल्या ग्राजियाची आई -
या अनोख्या लग्नात वाराणसीच्या स्थानिक लोकांनी या इटालियन जोडप्याच्या लग्नाची परंपरा पाळली. याठिकाणी पद्मा देवींनी ग्राजियाला आपली मुलगी मानले आणि पाउले यांच्यासमोर कन्यादान विधी केला. तसेच विजय कुमार वडिलांच्या भूमिकेत दिसले. लग्नाच्या वेळी अक्षत हा ग्राजियाचा भाऊ बनला. या लग्नाला रमेश कुमार पाउलेचे वडील म्हणून उपस्थित होते. यासोबतच या लग्नात हर हर महादेवचा जयघोषही घुमत राहिला.