अत्याचार करून आरोपी एवढ्यावरच थांबला नाही, तर त्याने तिचा गळा दाबून खून केला. तसेच तिच्या छातीत चाकुने वार केले. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, हत्येनंतर आरोपीने दारू आणली. दारु प्यायल्यानंतर त्याने पुन्हा विद्यार्थिनीच्या मृतदेहावर अत्याचार केले. या घटनेचा जबाब नोंदवत असताना एका महिला एसआयच्या देखील डोळ्यात पाणी आलं. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
advertisement
पीयूष अडीच तास विद्यार्थिनीसोबत खोलीत होता
सोमवारी पोलिसांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. तपासात असे दिसून आले की आरोपी १० फेब्रुवारी रोजी अडीच तास खोलीत होता. तो विद्यार्थिनीसोबत रुममध्ये जाताना दिसत आहे. तसेच खून केल्यानंतर एक बॅग घेऊन तो निघून जाताना देखील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालं आहे. आरोपीनं तब्बल अडीच तास विद्यार्थिनीवर कसे अत्याचार केले? याची माहिती आरोपीनं स्वत: दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, घटनेच्या दिवशी १० फेब्रुवारी रोजी पीडित विद्यार्थिनी आजारी होती. त्यामुळे तिने आरोपीसोबत शरीरसंबंध ठेवण्यास नकार दिला होता. मात्र केवळ बोलायचं असल्याचं सांगत आरोपी पीडितेला घेऊन आपल्या रुमवर गेला. इथं त्याने पीडितेवर अत्याचार करून तिची हत्या केली. पीडित तरुणी सोशल मीडियावर एका तरुणाशी बोलत होती. यामुळे ती आपल्याला धोका देतेय, असं आरोपीला संशय होता. याच संशयातून आरोपीनं तिची हत्या केल्याची माहिती समोर आली आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
