BLADE इंडिया कंपनीच्या पुढाकाराने ही शहरांतर्गत हेलिकॉप्टर सेवा बेंगळुरू आंतरराष्ट्रीय विमानतळावर ये-जा करणाऱ्या अनेक प्रवाशांचं जीवन सुकर करेल. विशेषत: ज्या व्यक्ती आयटी हब असलेल्या होसूरला जातात त्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
विमानतळावरून शहराच्या दक्षिणेकडच्या त्यांच्या गंतव्य स्थानावर जाण्यासाठी ते सकाळची हेलिकॉप्टर फ्लाइट (आणि होसूरहून विमानतळाकडे जणार्यांसाठी संध्याकाळची फ्लाइट) पकडू शकतील. दक्षिणेकडून उत्तरेकडे किंवा त्याउलट प्रवास करणाऱ्या व्यक्तीला रस्त्यावर तीन तास लागतात ही वस्तुस्थिती लक्षात घेता हेलिकॉप्टर प्रवास ही मोठी बाब आहे. या हेलिकॉप्टर सेवेमुळे एकूण 20 मिनिटांपेक्षा कमी वेळात हा प्रवास शक्य होईल. रस्त्यानं हाच प्रवास करण्यासाठी कित्येक तास लागतात.
advertisement
एखाद्या क्विक बिझनेस ट्रिपसाठी जाणाऱ्या व्यक्तींसाठी हा एक उत्तम पर्याय आहे. कारण, आता त्या व्यक्ती प्रवासात बरेच तास घालवण्याऐवजी वाचलेला वेळ काही तरी चांगलं करण्यास वापरू शकतील.
सकाळच्या फ्लाइट 8:45 वाजल्यापासून ते 10:30 AM पर्यंत असतील आणि परतीचा प्रवास दुपारी 3:45 ते संध्याकाळी 5 या वेळेत करता येईल. हेलिकॉप्टरने प्रवास करण्यासाठी प्रत्येक व्यक्तीला 6000 रुपयांचं तिकीट घ्यावं लागेल.
उपलब्ध माहितीनुसार, कर्नाटकची राजधानी असलेलं बेंगळुरू शहर हे बेंगळुरू जिल्हा व बेंगळुरू ग्रामीण जिल्हा अशा दोन जिल्ह्यांचं प्रशासकीय केंद्र आहे. या शहराला भारताच्या माहिती तंत्रज्ञान उद्योगाची राजधानी किंवा भारताची सिलिकॉन व्हॅली म्हणूनही ओळखलं जाते. येथे अनेक देशी-विदेशी टेक कंपन्यांची कार्यालयं असून, तिथे देशभरातले तंत्रज्ञ काम करतात. त्यामुळे तिथे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीची समस्या जाणवते. शहरांतर्गत हेलिकॉप्टर सेवा सुरू झाल्यानं या समस्येचा सामना करणाऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळू शकतो.