नेमकं काय म्हणाले एस जयशंकर?
याबाबत बोलताना जयशंकर यांनी म्हटलं आहे की, गेल्या वर्षी बाली शिखर परिषदेच्यावेळी सेनेगलचे राष्ट्रपती मैकी सॉल जे त्यावेळी आफ्रिकन युनियनचे अध्यक्ष होते. ते इंडोनेशियाचे राष्ट्रपती आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याजवळ आले. त्यांनी त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इंडोनेशियाच्या राष्ट्रपतींना G20 मध्ये आफ्रिकन युनियनला स्थायी सदस्यत्व मिळावे अशी इच्छा व्यक्त केली. यावर बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना तसं आश्वासन देखील दिलं होतं. अखेर पीएम मोदींनी आपलं आश्वासन पूर्ण केल्याचं जयशंकर यांनी म्हटलं आहे.
advertisement
पंतप्रधानांचं पत्र
जी20 मध्ये आफ्रिकन युनियनचा समावेश करण्याबाबत या वर्षी जूनमध्ये पहिल्यांदा चर्चा झाली होती. यंदा जी 20 चं अध्यक्षपद भारताकडे असल्यानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जी20 मधील सर्व सदस्य देशांना पत्र लिहीलं होतं. ज्यामध्ये G20 मध्ये आफ्रिकन युनियनला स्थायी सदस्यत्व मिळावे असा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रस्तावानंतर G20 मध्ये आफ्रिकन युनियनला स्थायी सदस्यत्व मिळालं आहे.
