सध्या बचावकार्य सुरू असून, अधिकाऱ्यांना मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती आहे. मृतांच्या संख्येबाबत अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नाही.
हवामान विभागाच्या श्रीनगर केंद्राने ‘नाऊकास्ट’ अलर्ट जारी केला आहे. त्यानुसार पुढील 4 ते 6 तासांत जम्मू-काश्मीरच्या अनेक भागांत मध्यम ते मुसळधार पावसासह अल्पकाळ तीव्र सरी, वीजांचा कडकडाट, गडगडाटी पाऊस आणि जोरदार वारे वाहण्याचा इशारा देण्यात आला आहे.
advertisement
दरम्यान जम्मू-काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी लष्कर आणि एनडीआरएफ अधिकाऱ्यांना बचावकार्य अधिक मजबूत करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यांनी म्हटले, किश्तवाडच्या चोशोटी येथे झालेल्या ढगफुटीबद्दल मला अतिशय दुःख झाले आहे. मृतांच्या कुटुंबीयांप्रति शोकसंवेदना आणि जखमींच्या लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करतो. नागरी प्रशासन, पोलीस, लष्कर, एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या अधिकाऱ्यांना बचाव व मदतकार्य अधिक प्रभावी करण्याचे आणि प्रभावितांना सर्वतोपरी मदत देण्याचे निर्देश दिले आहेत.