कोर्टाबाहेर पडताना देखील त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. कोर्टात उपस्थित असलेल्या लोकांनी सांगितले की, निकाल ऐकून ते पूर्णपणे खचून गेले होते आणि शांतपणे बाहेर निघून गेले. सध्या फक्त हे निश्चित झाले आहे की प्रज्वल रेवन्ना दोषी आहेत. न्यायालयाने सांगितले आहे की शिक्षेची घोषणा उद्या म्हणजेच 2 ऑगस्ट रोजी करण्यात येईल.
advertisement
नेमके आरोप काय होते?
माजी खासदार आणि माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांचे नातू प्रज्वल रेवन्ना मागील 14 महिन्यांपासून तुरुंगात आहेत. त्यांच्यावर एका नाही तर अनेक महिलांवर लैंगिक शोषण आणि बलात्काराचे आरोप ठेवण्यात आले होते. हे प्रकरण तेव्हा चिघळले जेव्हा सोशल मीडियावर त्यांच्या शेकडो आक्षेपार्ह व्हिडीओज व्हायरल झाले. त्यानंतर त्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आणि पोलिसांनी त्यांना अटक केली.
26 साक्षीदारांची चौकशी
या खटल्यात न्यायालयाने एकूण 26 साक्षीदारांची चौकशी केली. त्यांच्या साक्ष, पुरावे आणि वैद्यकीय अहवालांच्या आधारे कोर्टाने आपला निकाल दिला आहे. न्यायाधीश संतोष गजानन भट यांनी स्पष्टपणे सांगितले की, प्रज्वल रेवन्ना बलात्कार प्रकरणात दोषी आहेत.
केवळ 14 महिन्यांत खटल्याचा निकाल
या खटल्याची एक विशेष बाब म्हणजे केवळ 14 महिन्यांच्या आतच पूर्ण ट्रायल संपला आणि न्यायालयाने निकालही दिला. सामान्यतः अशा प्रकारच्या प्रकरणात वर्षानुवर्षे सुनावणी चालते, पण या प्रकरणात अत्यंत जलदगतीने प्रक्रिया पार पडली.
जामिनाच्या सर्व प्रयत्नांना अपयश
प्रज्वल रेवन्ना यांच्या वकिलांनी अनेकदा त्यांना जामिन मिळावा यासाठी प्रयत्न केले. पण न्यायालयाने प्रत्येक वेळी नकार दिला. कोर्टाचे म्हणणे होते की, ते एक प्रभावशाली कुटुंबातील आहेत आणि खटल्यावर परिणाम करू शकतात. कर्नाटक उच्च न्यायालय आणि सुप्रीम कोर्टानेही त्यांची जामिन याचिका फेटाळली होती.