कर्नाटकमध्ये सत्तांतराची चर्चा
संपूर्ण प्रकरण तेव्हा समोर आले जेव्हा अशा बातम्या आल्या की कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामैय्या आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्यात सर्व काही ठीक नाही. या दोन्ही दिग्गज नेत्यांचे समर्थक आमनेसामने आहेत. राज्यात मुख्यमंत्री पदावरून रस्सीखेच सुरू आहे. पक्षामधील या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर कर्नाटकमधील काँग्रेस प्रभारी रणदीप सुरजेवाला बेंगळुरूमध्ये पोहोचले आहेत. ते सुमारे 100 आमदारांशी स्वतंत्रपणे चर्चा करत आहेत. पक्षाकडून नुकसाननियंत्रणाच्या हालचाली सुरू आहेत.
advertisement
खर्गे म्हणाले – पक्ष हाय कमांड निर्णय घेईल
याचदरम्यान काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी कर्नाटकातील राजकारणावर भाष्य केले. त्यांनी सांगितले की कर्नाटकचा पुढचा मुख्यमंत्री कोण असेल, हे ठरवण्याचा निर्णय पक्षाच्या हाय कमांडकडे आहे. खर्गे म्हणाले की हा निर्णय हाय कमांड घेईल आणि त्यांच्याकडे पुढील कारवाई करण्याचा अधिकार आहे. मात्र कोणीही अनावश्यकपणे अडथळा निर्माण करू नये. काँग्रेस अध्यक्षांच्या या विधानावर भाजप खासदार तेजस्वी सूर्या यांनी टोला लगावला.
भाजप खासदार सूर्या यांचा पलटवार
भाजप खासदार तेजस्वी सूर्या यांनी एक्स पोस्टमध्ये लिहिले की, काँग्रेसचा हाय कमांड हा भुतासारखा आहे. तो अदृश्य आहे, ऐकू येत नाही, पण नेहमी जाणवतो. एवढंच नव्हे, तर लोक ज्या खर्गे यांना हाय कमांड मानतात, ते स्वतः म्हणतात की ते हाय कमांड नाहीत. हे किती भयानक आहे!
कसा वाढला कर्नाटक काँग्रेसमध्ये संघर्ष?
कर्नाटकमधील राजकीय संघर्ष एप्रिल महिन्यात अधिक तीव्र झाला. जेव्हा काँग्रेसचे आमदार बसवराज शिवगंगा, जे शिवकुमार यांचे समर्थक आहेत त्यांनी उघडपणे डिसेंबरपर्यंत सिद्धरामैय्यांना हटवण्याची मागणी केली. या मागणीमुळे राज्य काँग्रेसमधील गटबाजी स्पष्टपणे दिसून आली. मात्र पक्षाच्या हाय कमांडने या मुद्यावर सार्वजनिकरीत्या मतभेद करण्यास मनाई केली आहे. आता काँग्रेसचे कर्नाटक प्रभारी रणदीप सुरजेवाला बेंगळुरू येथे पोहोचले असून परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न करत आहेत.