TRENDING:

Lok Sabha Election 2024: भाजप कसं करू शकतं सरकार स्थापन? इंडिया आघाडीला किती हव्यात जागा?

Last Updated:

Lok Sabha Election 2024: 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या 543 जागांवर झालेल्या मतमोजणीत भाजप 241 जागांवर पुढे दिसत आहे. अशा परिस्थितीत भाजपला सरकार स्थापन करण्यासाठी बरीच जुळवाजुळव करावी लागणार आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या मंगळवारी जाहीर झालेल्या मतमोजणीत भारतीय जनता पक्ष (भाजप) 241 जागांवर आघाडीवर आहे. 543 जागांवर होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळवण्यासाठी 272 चा जादुई आकडा पार करावा लागेल. मात्र दुपारी 4.30 वाजेपर्यंतच्या मतमोजणीत कोणत्याही पक्षाला पूर्ण बहुमताने सरकार बनवता येत नसल्याचे दिसत आहे. पण, एनडीए सरकार आपल्या सर्व सहकारी घटकांसह 295 जागांसह सरकार बनवताना दिसत आहे. अशा परिस्थितीत, जर या ट्रेंडचे परिणामांमध्ये रुपांतर झाले, तर कोणते मित्र पक्ष भाजपचे सरकार बनवण्यासाठी सर्वात उपयुक्त ठरणार आहेत.
कोण करणार सत्ता स्थापन?
कोण करणार सत्ता स्थापन?
advertisement

चंद्राबाबू नायडू यांची साथ मिळणार?

आंध्र प्रदेशच्या राजकारणात मोठी उलथापालथ पाहायला मिळत आहे. तेलुगू देसम पार्टी (टीडीपी) पुन्हा एकदा राज्यातील सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास येत आहे. राज्यातील लोकसभेच्या एकूण 25 जागांपैकी टीडीपी 16 जागांवर आघाडीवर आहे. त्याच वेळी, भाजपचा मित्र पक्ष टीडीपीने 175 विधानसभा जागांपैकी 133 जागांवर आपला दावा मजबूत केला आहे. अशा स्थितीत एनडीएच्या मित्रपक्षांमध्ये चंद्राबाबू नायडू हे या निवडणुकांमध्ये सर्वात मोठे किंगमेकर ठरणार आहेत.

advertisement

नितीशकुमार यांचा करीश्मा पुन्हा चालला

लोकसभा निवडणुकीआधी जनता दल युनायटेडचे ​​सुप्रीमो नितीश कुमार यांनी इंडिया आघाडीची साथ सोडत महायुतीशी हातमिळवणी केली होती. त्याचा थेट फायदा या निवडणुकीत भाजपला होताना दिसत आहे. नितीश कुमार यांचा जेडीयू 14 जागांच्या आघाडीसह एनडीएचा तिसरा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे.

भाजप अडचणीत?

आतापर्यंतच्या ट्रेंडनुसार भाजप अडचणीत असल्याचे दिसत आहे. एनडीए जवळपास 290 जागांवर आघाडीवर असून त्यापैकी 240 जागा भाजपच्या वाट्याला जात आहेत. याचा अर्थ पंतप्रधान मोदींच्या तोंडावर निवडणूक लढवणाऱ्या भाजपला यावेळी स्वबळावर बहुमत मिळवता येणार नाही. अशा परिस्थितीत सरकार चालवण्यासाठी मित्रपक्षांच्या दयेवर अवलंबून राहावे लागेल. निर्णय घेताना पक्षाला तोटा सहन करावा लागू शकतो.

advertisement

वाचा - भाजप बहुमतापासून दूर; काँग्रेस-शरद पवार नवा डाव टाकण्याच्या तयारीत!

काँग्रेस सरकार स्थापन करू शकेल का?

आकडेवारीवर नजर टाकली तर भाजपला जरी बहुमत मिळू शकले नसले तरी एनडीएला स्पष्ट जनादेश आहे. ते सलग तिसऱ्यांदा सत्तेत येण्यास तयार आहे. पण गेल्या दोन निवडणुकांतील निराशाजनक कामगिरीनंतर 2024 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने मोठी मुसंडी मारली आहे. अशात काँग्रेस सरकार स्थापन करण्याच्या स्थितीत आहे का?

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
आले दर तेजीत, गुळ आणि शेवग्याला आज काय मिळाला भाव? Video
सर्व पहा

केंद्रात सरकार स्थापन करण्यासाठी काँग्रेसला 272 जागांची गरज आहे, तर ट्रेंडनुसार ती 225 जागांवर आघाडीवर आहे. याचा अर्थ काँग्रेसला सरकार स्थापन करण्यासाठी आणखी 47 जागांची आवश्यकता आहे. राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली काँग्रेसला सुमारे 20 जागांवर आघाडीवर असलेल्या इतर राजकीय पक्ष आणि अपक्षांकडे वळावे लागेल. अशाप्रकारे काँग्रेसला 28 जागा मिळू शकतात, पण तरीही बहुमतासाठी त्यांना 19 जागांची आवश्यकता असेल. आता जर काँग्रेसने बिहारमध्ये नितीश कुमारांना आपल्या गोटात आणले तर त्यांना आणखी 15 जागा मिळू शकतात, कारण ट्रेंडमध्ये जेडीयू इतक्या जागांवर आघाडीवर आहे. यानंतर नाराजीमुळे भाजपचे काही मित्रपक्ष काँग्रेसच्या छावणीत सामील झाले, तर केंद्रात राहुल गांधींचे सरकार येणार हे निश्चित आहे.

advertisement

मराठी बातम्या/देश/
Lok Sabha Election 2024: भाजप कसं करू शकतं सरकार स्थापन? इंडिया आघाडीला किती हव्यात जागा?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल