खरं तर, महाकुंभ मेळ्याला होणारी गर्दी लक्षात घेऊन सरकारने काही विशेष गाड्या सोडल्या आहेत. तरीही गर्दी कमी व्हायचं नाव घेत नाहीये. लोकांची गर्दी वाढतच चालली आहे. अशातच डीडीयू जंक्शनवर प्रवाशांमधील भांडणाचा एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये प्रयागराजला जाणाऱ्या ट्रेनमध्ये चढण्यासाठी प्रवाशांनी गर्दी केल्याचं बघायला मिळत आहे.
यावेळी ट्रेनमध्ये चढत असताना दोन गटांमध्ये तुफान राडा झाला आहे. एका गटातील एका व्यक्तीने दुसऱ्या गटातील एका व्यक्तीला मारहाण केली आहे. गर्दीतून मार्ग काढताना झालेल्या धक्काबुक्कीनंतर हे प्रकरण वाढलं. पहिल्या गटातील व्यक्तीने मारहाण केल्यानंतर दुसऱ्या गटातील व्यक्तीने देखील प्रतिहल्ला केल्याचं व्हिडीओत दिसून येत आहे. भर रेल्वे स्टेशनवर प्रवाशांमधील हा राडा पाहता, घटनास्थळी मोठी गोंधळ निर्माण झाला होता.
advertisement
पण सुदैवाने, स्टेशनवर उपस्थित असलेल्या आरपीएफ कर्मचाऱ्यांनी दोन्ही गटांना वेगळे केले आणि त्यांचं समुपदेशन करून वाद मिटवला आहे. डीडीयू रेल्वे स्थानकावर महाकुंभाला जाणाऱ्या लोकांची मोठी गर्दी जमत आहे. परिस्थिती अशी आहे की गाड्यांमध्ये पाय ठेवायलाही जागा नाही. पण संगमात पवित्र स्नान करण्यासाठी, भाविक कसेतरी ट्रेनमध्ये चढत आहेत. तर काहीजण ट्रेनमध्ये उभं राहून प्रवास करत आहेत.