दुपारी 1.30 वाजण्याच्या सुमारास तिचा मृतदेह विहिरीमध्ये सापडला. मुलीचा मृतदेह जूटच्या पिशवीमध्ये भरला होता, तसंच तिच्या गळ्याला कापड बांधलेले होते. 6 वर्षांच्या या मुलीचा गळा दाबून हत्या झाल्याचं पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये स्पष्ट झालं आहे.
'मुलीने अटक केलेल्या महिलेला आणि तिच्या बॉयफ्रेंडला आक्षेपार्ह स्थितीमध्ये पाहिलं होतं. यानंतर मुलगी बघितलेलं सगळं वडिलांना सांगणार असल्याचं म्हणाली. मुलगी तिथून जात असतानाच दोघांनीही तिची गळा दाबून हत्या केली', असं अतिरिक्त पोलीस अधीक्षक अशोक कुमार सिंह पीटीआयसोबत बोलताना म्हणाले.
advertisement
महिलेने दिली हत्येची कबुली
30 वर्षांच्या या महिलेचे 17 वर्षांच्या मुलासोबत 3 महिन्यांपासून प्रेमसंबंध होते. घटनेच्या दिवशी महिलेचा नवरा आणि सासू बाहेर गेले होते, त्यामुळे तिले बॉयफ्रेंडला घरी बोलावलं, यानंतर मुलीने दोघांनाही नको त्या अवस्थेमध्ये पाहिलं, यातूनच मुलीची हत्या करण्यात आली. अटकेच्या वेळी महिलेच्या हातावर चावा घेतल्याच्या खुणा होत्या, त्यामुळे मुलीने कदाचित पळून जाण्याचा प्रयत्न केला असेल, असा संशय पोलिसांना आहे. हातरसमधल्या सिकंदरा राऊ पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडलेल्या या घटनेमुळे खळबळ माजली आहे.