मुरादाबाद : बांग्लादेशमध्ये झालेल्या घडामोडींनंतर संपूर्ण देश ढवळून निघाला आहे. यातच त्याठिकाणी काही भारतीय विद्यार्थी अडकल्याचीही बातमी समोर आली होती. त्यातील एका विद्यार्थिनीने आपला भयानक अनुभव लोकल18 शी बोलताना व्यक्त केला.
आंचल सैनी असे या विद्यार्थिनीचे नाव आहे. आंचल सैनी ही भारतीय असून बांग्लादेशमध्ये एमबीबीएसच्या द्वितीय वर्षाला शिक्षण घेत आहे. ती मूळ उत्तरप्रदेशातील मुरादाबादच्या अगवानपुर येथील रहिवासी आहे. अचानक बांग्लादेशात झालेल्या हिंसाचारानंतर तेथील परिस्थिती बिघडली आणि विद्यार्थी तिथेच अडकले. आता ती भारतात परतली असून लोकल18 शी बोलताना तिने आपला अनुभव सांगितला.
advertisement
Photos : सर्पमित्रांनी सांगितलं, सापांना दूध पाजणं योग्य कि अयोग्य?, महत्त्वाची माहिती..
आंचल सैनीने लोकल18 शी बोलताना सांगितले की, तेथे इंटरनेट बंद करण्यात आले होते आणि सर्वत्र हिंसाचाराच्या घटना कानावर येत होत्या. त्यावेळी मी माझ्या देशात पोहोचू शकेन काही नाही, असे वाटत होते. मात्र, भारतीय उच्चायुक्ताच्या अधिकाऱ्यांनी माझ्याशी संपर्क केला आणि मला पूर्ण मदत करत आपल्या देशात आणले. आता मी आनंदी असून मी त्या सर्व अधिकाऱ्यांना धन्यवाद देत असल्याचे तिने म्हटले.
आंचल सैनी ही सध्या बांग्लादेशातील खुलना जीएमसी कॉलेज (गाजी मेडिकल कॉलेज) येथून एमबीबीएसचे शिक्षण घेत आहे. बांग्लादेशात हिंसाचार झाला तेव्हा ती आपल्या हॉस्टेलमध्येच होती. तसेच हिंसाचारादरम्यान तिला हॉस्टेलमध्ये बंद करण्यात आले होते. तिला बाहेर जाऊ दिले जात नव्हते. तिला बाहेर काय सुरू आहे, तिला काहीच दिसत नव्हते. कुटुंबीयांशी सुद्धा काही संपर्क होत नव्हता. इंटरनेट बंद करण्यात आले होते. ती खूप चिंतेत होती. तसेच आपल्या आई वडिलांची आठवण करत होती. सर्व ठिक होऊन जाईल, असे तिला सांगण्यात येत होते.
विनेश फोगाट ऑलिम्पिकमध्ये अपात्र, कुस्तीपंढरी कोल्हापुरातील कुस्तीपटूंनी घातली ही भावनिक साद, VIDEO
तिने सांगितले की, आमच्या सिनिअर्स विद्यार्थ्यांनी भारत सरकारशी संपर्क केला असून त्यांनी आम्हाला मदत केली. यामुळे आम्ही बाहेर आलो. आम्हा सर्वांना भारतात आणण्यात भारतीय दूतावासाने मोठी भूमिका बजावली. त्यांच्या मदतीनेच आम्ही इथे पोहोचू शकलो. इतक्या कठीण परिस्थितीत त्यांनी आमची मदत केली, त्यासाठी मी त्यांचे आभार मानते, असे ती म्हणाली. दरम्यान, तिचे वडील रामकिशन सैनी यांनीही मोदी सरकारचे आभार मानले.
