Photos : सर्पमित्रांनी सांगितलं, सापांना दूध पाजणं योग्य कि अयोग्य?, महत्त्वाची माहिती..
- Published by:Khushalkant Dusane
- local18
- Reported by:Shivani Dhumal
Last Updated:
भारतात वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक राहतात. त्यामुळे भारतातील वेगवेगळ्या भागात लोकं आपापल्या परंपरेप्रमाणे सण साजरे करतात. यामध्ये एक परंपरा आहे, ज्यात नागपंचमीला लोक नागांना दूध पाजतात. परंतु नागांना खाऊ घालणे किती योग्य आणि अयोग्य आहे, हे फार कमी लोकांना माहित आहे. अपुऱ्या ज्ञानामुळे आपण नागाला दूध देणे हे पुण्याचे काम मानतो, परंतु तसे अजिबात नाही. यामुळे नागाचा मृत्यू सुद्धा होऊ शकतो. सर्पमित्र राजू कदम यांनी ही माहिती दिली. (शिवानी धुमाळ/पुणे, प्रतिनिधी)
लोकल18 शी बोलताना त्यांनी सांगितले की, नागपंचमीला सापांना दूध पाजण्याची प्रथा सगळीकडे आहे. परंत नागांना दूध पाजणे हे फार धोकादायक आहे. दूध पिल्याने नागाचे फुफ्फुसे आणि आतडेही खराब होतात आणि नंतर काही दिवसांनी त्यांचा मृत्यू होतो. म्हणूनच नागांना कधीही दूध पाजू नका, असं सर्पमित्र सांगतात. साप रेंगळणाऱ्या प्राण्यांमध्ये येतात, जे पूर्णपणे मांसाहारी असतात. साप हे बेडूक, उंदीर, पक्षी, सरडे, इतर लहान साप वगैरे खातात. साप दूध पितो हे पूर्णपणे चुकीचे आहे. ही एक चुकीची परंपरा आहे, जी आपण वर्षानुवर्षे मानत आलो आहोत.
advertisement

advertisement
सापांसाठी खरंतर दूध विष असतं. नाग मासांहारी असतात. दूध प्यायल्यामुळे दुर्धर आजार जडून त्यांचा मृत्यू होतो. पण अनेक दिवसांपासून तहानले असल्यामुळे तहान भागवण्यासाठी देण्यात येणारं दूध ते लगेच पितात. शहरातील, गावातील भाविकांना आपण त्यांना नैवेद्य दाखवतोय असं वाटतं. पण वास्तवात ते त्यांना मृत्यूच्या दारात ढकलत असतात. हे दूध पिऊनच हळूहळू या सापांचा मृत्यू होतो. वैज्ञानिकदृष्ट्या नागांना दूध देणे चुकीचे मानले जाते. यामुळे त्यांचा जीव धोक्यात येऊ शकतो. वास्तविक नाग हा सरपटणारा जीव आहे. सरपटणारे प्राणी दूध पचवू शकत नाहीत, असं सर्पमित्र यांनी म्हटले आहे.
advertisement

advertisement
भारतात वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक रहातात. त्यामुळे भारतातील वेगवेगळ्या भागात लोकं आपापल्या परंपरेप्रमाणे सण साजरे करतात. यामध्ये एक परंपरा आहे, ज्यात नागपंचमीला लोक नागांना दूध पाजतात. परंतु नागांना खाऊ घालणे किती योग्य आणि अयोग्य आहे, हे फार कमी लोकांना माहित आहे. अपुऱ्या ज्ञानामुळे आपण नागाला दूध देणे हे पुण्याचे काम मानतो. मात्र, तसे अजिबात नाही. यामुळे नागाचा मृत्यूही होऊ शकतो. नागपंचमीला सापांना दूध पाजण्याची प्रथा सगळीकडे आहे. मात्र, नागांना दूध पाजणे हे फार धोकादायक आहे.
advertisement

advertisement
दूध पिल्याने नागाचे फुफ्फुसे आणि आतडेही खराब होतात आणि नंतर काही दिवसांनी त्यांचा मृत्यू होतो. म्हणूनच नागांना कधीही दूध पाजू नका, असं सर्पमित्र सांगतात. साप रेंगळणाऱ्या प्राण्यांमध्ये येतात, जे पूर्णपणे मांसाहारी असतात. साप हे बेडूक, उंदीर, पक्षी, सरडे, इतर लहान साप वगैरे खातात. साप दूध पितो हे पूर्णपणे चुकीचे आहे. ही एक चुकीची परंपरा आहे, जी आपण वर्षानुवर्षे मानत आलो आहोत, असे सर्पमित्र म्हणतात.

सापांसाठी खरंतर दूध विष असतं. नाग मासांहारी असतात. दूध प्यायल्यामुळे दुर्धर आजार जडून त्यांचा मृत्यू होतो. पण अनेक दिवसांपासून तहानले असल्यामुळे तहान भागवण्यासाठी देण्यात येणारं दूध ते लगेच पितात. शहरातील, गावातील भाविकांना आपण त्यांना नैवेद्य दाखवतोय असं वाटतं. पण वास्तवात ते त्यांना मृत्यूच्या दारात ढकलत असतात. हे दूध पिऊनच हळूहळू या सापांचा मृत्यू होतो. वैज्ञानिकदृष्ट्या नागांना दूध देणे चुकीचे मानले जाते. यामुळे त्यांचा जीव धोक्यात येऊ शकतो. वास्तविक नाग हा सरपटणारा जीव आहे. सरपटणारे प्राणी दूध पचवू शकत नाहीत, असे सर्पमित्र यांनी म्हटले आहे.

सूचना - वर दिलेली माहिती ही सर्पमित्रांशी साधलेल्या संवादावर आधारित आहे. याबाबत लोकल18 कोणताही दावा करत नाही.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
August 07, 2024 2:58 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
Photos : सर्पमित्रांनी सांगितलं, सापांना दूध पाजणं योग्य कि अयोग्य?, महत्त्वाची माहिती..


