मिळालेल्या माहितीनुासर, छत्तीसगडच्या बिजापूर आणि दंतेवाडा जिल्ह्याच्या सीमेवर माओवादी आणि जवानांमध्ये चकमक झाली. या कारवाईत एका जहाल महिला माओवाद्यांचा मृत्यू झाला आहे. चकमकीत ठार झालेली महिला माओवादी रेणू होती. तिच्यावर वेगवेगळ्या राज्यात मिळून तब्बल 1 कोटी रुपये तिच्यावर बक्षीस होतं. ती माओवाद्यांच्या दंडकारन्य झोनल समितीची प्रसार माध्यमांची प्रभारी होती. 50 पेक्षा जास्त गंभीर गुन्हे दाखल असलेली रेणू आज चकमकीत ठार झाल्यानंतर तिचा मृतदेह घेऊन जवान परतले आहे. जवानांचे चकमकीतलं यश पाहता त्यांचे अभिनंदन करण्यासाठी Dig कमलोचन कश्यप स्वतः त्या ठिकाणी जाऊन जवानांचं अभिनंदन करून मनोधैर्य वाढवत होते.
advertisement
एलएलबी आणि प्रभातची संपादक होती रेणू
चकमकीत ठार झालेली जहाल महिला माओवादी रेणू ही उच्चशिक्षित असून एलएलबीचं शिक्षण घेतलं होतं. रेणू 1996 मध्ये माओवादी संघटनेत दाखल झाली होती. ती सध्या माओवाद्यांचं मुखपत्र असलेल्या प्रभातची संपादक असून तिच्यावर दंडकारण्यात चार राज्यात मिळून एक कोटी रुपयांच बक्षीस असल्याची माहिती आहे. माओवाद्यांच्या केंद्रीय समितीच्या सदस्य असलेल्या शाखमोरी आप्पाराव याची रेणू ही पत्नी असून उच्चशिक्षित असल्याने माओवाद्यांच्या सगळ्या केडरला मार्गदर्शन करायची. तसंच प्रभात मुखपत्राच्या माध्यमातून दंडकारण्यात माओवादी विचारधारेचा प्रचार करण्यात रेणुने महत्त्वाची भूमिका बजावली आहे..