मुंबई आणि अहमदाबाद दरम्यान बुलेट ट्रेन 320 किलोमीटर प्रतितास वेगाने धावेल. रेल्वेमंत्र्यांनी रविवारी भावनगर टर्मिनसवरून ३ नवीन गाड्यांना हिरवा झेंडा दाखवला - भावनगर-अयोध्या एक्सप्रेस, रीवा-पुणे एक्सप्रेस आणि जबलपूर-रायपूर एक्सप्रेस. यावेळी त्यांनी सांगितले की, मुंबई आणि अहमदाबाद दरम्यान बुलेट ट्रेनचा प्रवास अंदाजे २ तास ७ मिनिटांत पूर्ण होईल.
मुंबई आणि अहमदाबाद बुलेट ट्रेन कॉरिडॉरवर एकूण १२ स्टेशन्स असतील: मुंबई, ठाणे, विरार, बोईसर, वापी, बिलिमोरा, सूरत, भरुच, वडोदरा, आणंद, अहमदाबाद आणि साबरमती. ही लाइन मुंबईच्या बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्सपासून सुरू होऊन अहमदाबादच्या साबरमती इथे संपेल. लवकरच बुलेट ट्रेनचं ट्रायल रन सुरू होईल असं सांगितलं जात आहे.
advertisement
म्हणे, IT मध्ये काम करणाऱ्यांना असतो भरपूर पगार, मग CEO किती घेतात? या कंपनीचा सीईओ सगळ्यात श्रीमंत
बुलेट ट्रेनचं काम 2027 पर्यंत पूर्ण होईल. महाराष्ट्रात ट्रायल रन आणि बाकी संपूर्ण काम पूर्ण होण्यासाठी 2029 पर्यंतचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. त्यानंतर मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन सुरू होईल असं सांगितलं जात आहे. याबाबत निश्चित तारीख समोर आली नाही. मात्र आणखी तीन वर्ष लागण्याची शक्यता आहे. 2030 पर्यंत ही ट्रेन प्रवाशांसाठी सुरू होण्याची शक्यता असल्याचं सांगितलं जात आहे.
