नरहरी झिरवाळ म्हणाले की, आमच्या भगिनी द्रोपदी मुर्मू राष्ट्रपती झाल्या आहेत. आदिवासी समाजातील ज्या समस्या आहेत त्या हक्काच्या ठिकाणी मांडाव्या यासाठी दिल्लीत आलो आहे.आदिवासी मध्ये धनगर समाज हा आरक्षण मागतोय. आमचा धनगर समाजाला विरोध नाही. फक्त आमच्यात नको अशी आमची मागणी आहे. हे आमचं हक्काचं आरक्षण आहे. या मागणीसाठी आम्ही राष्ट्रपतींना विनंती करणार आहोत.
advertisement
पेसा भरती, अधिसंख्य पद ठरवले आहेत. वनदाव्यांचा प्रश्न आहे. आदिवासी समाज जंगलात राहतो. जंगल जमीनीचा मूळ मालक आहे. पण त्यालाच अडचणी येतात. पाणीसाठा, रस्त्याचा प्रश्न आहे. त्यावर विकास आदिवासी समाजा पर्यंत पोहोचायला पाहीजे असंही नरहरी झिरवाळी यांनीन सांगितलं.
नरहरी झिरवाळ हे पत्नीसह दिल्लीला पोहोचले आहेत. याबाबत ते म्हणाले की, माझ्या बायकोला दिल्लीला घेऊन आलोय. मी दौ-यावर असतो पण तिला कुठे नेलं नव्हतं. तिच्या मनात माझ्या बद्दल रोष नको म्हणून घेऊन आलोय.