राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि निवडणूक चिन्ह कुणाचं यावर केंद्रीय निवडणूक आयोगात सुरू असलेली सुनावणी आज पूर्ण होण्याची शक्यता आहे. केंद्रीय निवडणूक आयोग आजच्या प्रतिवादानंतर निकाल राखून ठेवू शकतो. दोन्ही गटांच्या वतीने एका आठवड्यात लेखी प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचा आदेश देण्यात आला आहे. आजच्या सुनावणीवेळी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून खासदार सुप्रिया सुळे, जितेंद्र आव्हाड आणि मेहबूब शेख हे उपस्थित होते. तर राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून खासदार सुनील तटकरे, पार्थ पवार, सुरज चव्हाण निवडणूक आयोगाच्या कार्यालयात उपस्थित होते.
advertisement
अजित पवार गटाचे वकील मुकुल रोहोतगी म्हणाले, की सुनावणी संपली आहे. 2 ते 3 आठड्यात निकाल येण्याची शक्यता आहे. तर अभिषेक मनु सिंघवी यांनी सांगितले की ही केस आज युक्तिवाद स्तरावर संपली. निवडणूक आयोगाने हा निर्णय राखीव ठेवला. आमची मतं लेखी स्वरूपात द्यायला सांगितली आहे. निर्णय निवडणूक आयोगाच्या हाती आहे. अजित पवार गटाकडून स्पष्ट केलं आहे की संघटनेचं मत विचारात घेऊ नका. म्हणजे हे स्पष्ट होतं की त्यांच्याकडे संघटांन नाही हे त्यांच्या हरण्याचा द्योतक आहे.
वाचा - 'पूर्वी मतदारसंघात येताना मला टोल लागायचा..' खासदार अमोल कोल्हेंचा रोख कुणाकडे?
लोकप्रतिनिधी यांची संख्या विचारात घेणे चुकीचं होईल. त्यांनी सांगितल की 2019 पासून आमच्यात वाद होते. संविधानातील त्रुटी आणि इतर गोष्टी त्यांनी आधी सांगितल्या नव्हत्या. हे सगळ त्यांनी पहिल्यांदा 30 जूनला सांगितलं. एकीकडे सांगता की 2019 पासून वाद आहे आणि दुसरीकडे तुम्ही पद घेता त्यावेळी काही बोलत नाहीत, असा सवाल अभिषेक मनु सिंघवी यांनी उपस्थित केला.