TRENDING:

NEET पेपर लिक प्रकरणात धक्कादायक माहिती समोर! आरोपीच्या हिस्ट्रीने पोलिसही शॉक

Last Updated:

NEET Paper Leak : सध्या देशभर गाजत असलेल्या नीट पेपर लिक प्रकरणात मोठी अपडेट आली आहे. या प्रकरणात आता एका आरोपीचं नाव समोर आलं आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नवी दिल्ली : देशभरात नीट यूजी 2024 ही वैद्यकीय प्रवेश परीक्षा मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. या परीक्षेचा निकाल वादात सापडला आहे. नीट परीक्षा रद्द करण्याची मागणी करणाऱ्या याचिका सुप्रीम कोर्टात जवळपास दररोज दाखल होत आहेत. या प्रकरणाचे धागेदोरे बिहार आणि महाराष्ट्रापर्यंत पोहोचले असल्याचं समोर आलं आहे. बिहारमधल्या आर्थिक गुन्हे शाखेच्या तपासकर्त्यांनी कथित नीट-यूजी पेपर लीक प्रकरणाची चौकशी केंद्रीय अन्वेषण ब्युरोकडे (सीबीआय) सोपवताना संजीव कुमार मुखिया या व्यक्तीचं नाव अधोरेखित करून दिलं आहे. तपास अधिकाऱ्यांना विश्वास आहे की, हे संपूर्ण या व्यक्तीमुळे सुरू झालं आहे.
नीट
नीट
advertisement

मुखिया हा 'सॉल्व्हर गँग' नावाच्या आंतरराज्य नेटवर्कचा प्रमुख असल्याचं म्हटलं जात आहे. हे नेटवर्क स्पर्धा परीक्षांच्या सोडवलेल्या प्रश्नपत्रिका विकतं. 51 वर्षांचा मुखिया हा पेपर लीकच्या पाच मोठ्या प्रकरणांमध्ये सामील असल्याचं मानलं जात आहे. यामध्ये बिहार शिक्षक भरती परीक्षेचाही समावेश आहे. या प्रकरणी या वर्षाच्या सुरुवातीला मुखियाचा मुलगा डॉ. शिव उर्फ बिटूला अटक करण्यात आली होती. त्या प्रकरणाची सुनावणी अद्याप बाकी आहे.

advertisement

2016 ते 2021 दरम्यान मुखिया हा नालंदातल्या भुताहाखार पंचायतीचा प्रमुख होता. त्यामुळे तो दोन दशकांहून अधिक काळापासून पेपर लीक रॅकेटमध्ये सामील असल्याचा आरोप आहे. रणजित डॉनचा मदतनीस म्हणून त्याने काम केल्याचं म्हटलं जातं. रणजित हा 90 च्या दशकात आणि 2000 च्या सुरुवातीच्या काळात अनेक परीक्षांशी संबंधित रॅकेटमध्ये सहभागी होता. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुखिया हा नालंदातल्या नूरसराय इथल्या उद्यान विद्यालयात 10 वर्षांहून अधिक काळापासून तांत्रिक सहायक आहे. बिहारमधल्या आणि बिहारबाहेरच्या किमान चार पेपर लीक रॅकेटमध्ये त्याचं नाव आहे.

advertisement

बिहारमध्ये एका दशकापूर्वी ब्लॉक-स्तरीय परीक्षेचा पेपर लीक झाल्याप्रकरणी आणि 2016 मध्ये उत्तराखंडमधल्या कॉन्स्टेबल भरती परीक्षेचा पेपर लीक झाल्याप्रकरणी त्याला अटक झाली होती. विशेष म्हणजे, मुखियाचा मुलगा डॉक्टर शिवला या वर्षी बिहारमधल्या शिक्षक भरती परीक्षा-III मध्ये झालेल्या कथित गैरप्रकाराबाबत अटक करण्यात आली होती. या प्रकरणामध्ये मुखियाचाही सहभाग असल्याचा आरोप आहे; मात्र त्याला अटक करण्यात आली नाही. मुखिया सध्या फरार आहे. शिवाय, त्याने स्थानिक कोर्टात अटकपूर्व जामीन याचिकादेखील दाखल केली आहे.

advertisement

तपासकर्त्यांच्या म्हणण्यानुसार, मुखियाचा जवळचा सहकारी असलेल्या बलदेव कुमारला 5 मे रोजी सकाळी (परीक्षेच्या दिवशी) सोडवलेल्या प्रश्नपत्रिकेची पीडीएफ मिळाली होती. हीच आन्सर की उमेदवारांना लक्षात ठेवायला लावली होती. या प्रकरणात झारखंडमधल्या देवघर इथून 'सॉल्व्हर गँग'च्या पाच सदस्यांना अटक करण्यात आली आहे. त्यामध्ये बलदेवचाही समावेश आहे.

वाचा - NEET परीक्षा पेपरफुटी प्रकरणी धक्कादायक माहिती समोर, लातूरमधून 2 शिक्षक ताब्यात

advertisement

मुखियाचं पॉलिटिकल कनेक्शन

मुखियाच्या नावावर अनेक खटले असूनही त्याने प्रॉक्सीद्वारे राजकीय महत्त्वाकांक्षा बाळगली आहे. 2020च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी मुखियाची पत्नी ममता देवी बिहारचे तत्कालीन मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या जनता दलची (युनायटेड) सदस्य होती. नंतर तिने पक्ष सोडला आणि लोक जनशक्ती पक्षाची उमेदवार म्हणून नालंदातल्या हरनौतमधून तिने निवडणूक लढवली होती. जेडीयूच्या हरी नारायण सिंह यांनी तिचा पराभव केला होता.

विरोधी पक्ष राष्ट्रीय जनता दलाने (आरजेडी) सोमवारी (24 जून), जेडी(यू) आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीतल्या इतर पक्षांच्या नेत्यांसह ममता देवीचे फोटो प्रसिद्ध केले. जेडी(यू) किंवा चिराग पासवान यांच्या लोक जनशक्ती पक्षाने (रामविलास) यावर भाष्य केलेलं नाही. जेडी(यू) च्या एका नेत्याने नाव न सांगण्याच्या अटीवर कबूल केलं, की हा संबंध लाजिरवाणा आहे; पण या नेत्याने असंही सांगितलं, की राजकारण आणि सार्वजनिक आयुष्यात अनेक राजकीय मर्यादा असतात. एका एलजेपी (आर) नेत्यानंही असंच म्हटलं आहे.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
आले दर तेजीत, गुळ आणि शेवग्याला आज काय मिळाला भाव? Video
सर्व पहा

आरजेडीचे राष्ट्रीय प्रवक्ते मनोज के. झा यांनी असा युक्तिवाद केला, की या प्रकरणाची तीव्रता अधोरेखित आणण्यासाठी आपल्या पक्षाने हे फोटो प्रसिद्ध केले आहेत. इंडियन एक्सप्रेसशी बोलताना ते म्हणाले, "अनेक राज्यांचा समावेश असलेला आणि एनटीएवर प्रश्न निर्माण करणाऱ्या या घोटाळ्याची सखोल चौकशी करणं गरजेचं आहे."

मराठी बातम्या/देश/
NEET पेपर लिक प्रकरणात धक्कादायक माहिती समोर! आरोपीच्या हिस्ट्रीने पोलिसही शॉक
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल